राजन विचारेंना विरोध करणार्‍या गावात पोलीस कशाला घुसवता? – eNavakal
आघाडीच्या बातम्या निवडणूक महाराष्ट्र

राजन विचारेंना विरोध करणार्‍या गावात पोलीस कशाला घुसवता?

ठाणे – ठाण्यात मतदानापूर्वी दोन दिवसाअगोदर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे यांना विरोध केल्यामुळे वाघबीळ गावात 500 पोलीस घुसल्याने वादाला तोंड फुटले आहे. या पोलिसी दपडशाहीचा निषेध करताना राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले की, शिवसेना नेत्यांनी ठाण्यातील रस्त्यापासून टॉवर बांधण्याची कंत्राटे स्वतःला घेतली. सेक्युरिटी यांची, हाऊसकीपिंग यांची, केबल लाईन यांची. मग बाकीच्यांना कामे मिळणार कशी! त्यांचे पोट भरणार कसे? त्यातूनच लोकांच्या मनात राजन विचारेंबद्दल क्षोभ निर्माण झाला तर काय करायचे?
आव्हाडांनी या पोलिसी दडपशाहीबद्दल संताप व्यक्त करताना सांगितले की, वाघबीळ, कासार वडवली, कोपरी आदी गावांमधून राजन विचारेंना विरोध होत आहे. अशी अनेक गावे आहेत. नवी मुंबईच्या 10,000 लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. काय करणार पोटावर लाथ बसल्यावर! वाघबीळ हे गाव फक्त 1500 लोकांचे त्यात जैन, मारवाडी, कोळी अशी सर्व समाजाची माणसे राहतात. त्यांना घाबरविण्यासाठी 500 पोलीस घुसविले जातात. हा सत्तेचा गैरवापर आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

त्रालमध्ये चकमक! एका दहशतवाद्याला कंठस्नान

त्राल – जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये आज सकाळपासून चकमक सुरू आहे. या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं आहे. या...
Read More
post-image
मुंबई

मुंबई महापालिका रुग्णालयांना होणारा औषध पुरवठा आजपासून बंद

मुंबई – आजपासून मुंबईतील पालिकेच्या रुग्णालयांना होणारा औषधपुरवठा बंद होणार आहे. त्यामुळे रुग्णांना हाल सोसावे लागणार आहेत. ऑल फूड अॅण्ड लायसन्स होल्डर फाऊंडेशनने महापालिकेच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री पॉम्पिओ भारत दौऱ्यावर! पंतप्रधानांची घेतली भेट

नवी दिल्ली – अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ हे तीन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी...
Read More
post-image
महाराष्ट्र

इमारतीच्या प्लास्टरचा भाग कोसळून भिवंडीत ११ वर्षीय मुलीचा मृत्यू

भिवंडी – ३० वर्ष जुन्या इमारतीच्या प्लास्टरचा भाग कोसळून अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना भिवंडीच्या पद्मानगर भागात घडली आहे. गंगाजमुना या दुमजली इमारतीतील...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र हवामान

गोव्यात मुसळधार पाऊस! जनतेला दिलासा

पणजी – गोव्यात आज मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. येथे गेल्या आठवड्यात ७० टक्के कमी पावसाची नोंद करण्यात आली असल्याने पावसाच्या प्रतीक्षात असलेली जनता पावसाने...
Read More