राजकोट जिल्ह्यात पाटीदार समाजाची भूमिका निर्णायक – eNavakal
देश राजकीय

राजकोट जिल्ह्यात पाटीदार समाजाची भूमिका निर्णायक

गुजरात विधानसभा 2017 च्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात होणार्‍या राजकोट जिल्ह्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्या राजकोट पूर्व मतदार संघासोबतच राजकोट पश्चिम, राजकोट दक्षिण, राजकोट ग्रामीण जसदन, गोंडल, जेतपूर आणि धोराजी या मतदारसंघामध्ये होणार्‍या मतदानात मोठ्या संख्येने पाटीदार समाजाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. राजकोट जिल्ह्यातील राजकोट दक्षिण मतदारसंघात एकूण 2 लाख 38 हजार 312 मतदारांपैकी 55 हजार मतदार हे पाटीदार समाजाचे आहेत. त्याशिवाय 40 हजार बक्षी पक्ष, 30 हजार सेली, 25 हजार लोहाणा, 10 हजार दलित, 20 हजार ब्राह्मण समाजाचे मतदार आहेत. या जागेवर भाजपने गेल्यावर्षीचेच उमेदवार आमदार गोविंद पटेल यांना पुन्हा संधी दिली आहे. तर काँग्रेसने जिल्हा माजी अध्यक्ष डॉ.दिनेश चोवटिया यांना तिकीट दिले आहे. या जागेवर भाजपविरोधात समाजात असलेल्या असंतोषाचा परिणाम भोगावा लागू शकतो. राजकोट शहरमध्ये भाजपच्या तर्फे लोहाणा तसेच ब्राह्मण समाजाला संधी न मिळाल्याने त्यांच्यातही नाराजगी आहे. अशामुळे पाटीदारांसोबतच लोहाणा आणि ब्राह्मण समाजदेखील महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. राजकोट पश्चिम मतदारसंघातून मुख्यमंत्री विजय रूपाणी यांना काँग्रेसचे इंद्रनिल राजगुरू टक्कर देत आहेत. पाटीदार समाजाचे 70 हजार मतदारांसोबत ब्राह्मण 35 हजार, लोहाणा 27 हजार, दलित 20 हजार व अल्पसंख्याक 20 हजार मतदारांसह एकूण 3 लाख 8 हजार 487 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राजकोट पूर्व मतदारसंघात काँग्रेसने नवीन चेहर्‍याला संधी दिली आहे. 2012च्या निवडणुकीत या जागी काँग्रेसचा उतमेदवार जिंकला होता. परंतु यावेळी दोन्ही पक्षांनी लेहवा पाटीदारांना संधी दिली आहे. भाजपने अरविंद इयाणी पार्वद तर काँग्रेसने मितुल दौंगा यांना तिकीट दिले आहे. या मतदारसंघात 70 हजार पाटीदार, 35 हजार कोळी, 30 हजार प्रजापती, 12 हजार अल्पसंख्यांक, 11 हजार इतर समाज असे मिळून एकूण 2 लाख 53 हजार 147 मतदार आहेत. राजकोट ग्रामीण मतदारसंघात गेल्या निवडणुकीत उमेदवार भानुबेन बाबरिया यांच्या विरोधात हरलेल्या काँग्रेसचे उमेदवार लाखाभाई सागठिया यांना यंदा भाजपने तिकीट दिले आहे. त्यामुळे भानु बेनच्या समर्थकांमध्ये नाराजगी आहे. तर काँग्रेसने वशराम साठिया यांना तिकीट दिले आहे. याठिकाणी सर्वाधिक 56 हजार पाटीदार समाजाचे मतदार आहेत. त्याशिवाय 64 हजार बक्षीपंथ, 40 हजार दलित, 20 हजार राजपूत असे एकूण 2 लाख 88 हजार 591 मतदार आहेत. येथील अपक्ष कल्पेश परमार यांची अनुक्रमे 5905 रुपये तर 6000 रुपये इतके उत्पन्न आहे. सावरकुंडला मतदारसंघात व्रजलाल वलोदरा आणि सुरत पश्चिमेतील मोहम्मद सेलोद या दोन्ही अपक्ष उमेदवारांची वार्षिक कमाई 10 हजार इतकी आहे.
सुरेंद्रनगर जिल्ह्यातील वाधा मतदारसंघातून भाजप उमेदवार धानजी भाई पटेल यांनी 113 कोटी उत्पन्न दाखवले असून ही कमाई शेती आणि उद्योगातून झाल्याचे नमूद केले आहे. तर देवभूमी द्वारका जिल्ह्यातील भाजपचेच तिरांना मनेक यांची 88 कोटींची कमाई उद्योगातून केल्याचे नोंदवले आहे. भाजपचे आणखी एक बोटडचे करोडपती उमेदवार यशवंतभाई दलाल पटेल यांनी ही पत्नीचे उत्पन्न, उद्योग यातून 123 कोटी उत्पन्न कमावल्याचे नमूद केले आहे. जुनागड जिल्ह्यातील केशोद मतदारसंघातून देवाभाई मलम आणि राजकोट जिल्ह्यातील गोंडल मतदार संघातून गीताबा जाडेजा या दोन्ही भाजप उमेदवारांनी आपेल वार्षिक उत्पन्न शून्य असल्याचे सांगितले आहे. निवडणूक म्हटले की पाण्यासारखा पैसा ओतावा लागतो. प्रचारासाठी जमा होणारे कार्यकर्ते, युवक, युवती, सभेला गर्दी करणारे नागरिक या सर्वांचा खर्च उमेदवार मोठ्या मनाने करतो. मात्र गुजरात निवडणुकीत एवढ्या मोठ्या प्रमाणात असणार्‍या धनाढ्य उमेदवारांमध्ये मतदार कोणाला झुकते माप देते हे पाहणे औत्सुकाचे ठऱणार आहे.

समाजाचे 44 हजार 200 मतदार, कडवा-पाटीदार 56 हजार, दलित समाज 21 हजार, अल्पसंख्याक 40 हजार, क्षत्रिय 10 हजार मतदार असून एकूण 2 लाख 28 हजार 903 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
पाटीदार आरक्षणाच्या आंदोलनाला मोठ्या संख्येने पाठिंबा मिळालेल्या राजकोट जिल्ह्यात विविध समाजातील लोकांमध्ये भाजपविरोधात नाराजी आहे. त्यामुळे हा जिल्हा निवडणुकीत महत्त्वाचा ठऱतो.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन

नवी दिल्ली – देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी यांचे गुरूवारी सायंकाळी ५ वाजता निधन झाले. वाजपेयी यांच्या पार्थिवावर राजघाटाजवळील राष्ट्रीय सृतीस्थळी लष्करी इतमामात आज शुक्रवारी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

19 ऑगस्टला हरिद्वारमध्ये अटलजींचे अस्थिविसर्जन

नवी दिल्ली – देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी यांचे गुरूवारी सायंकाळी ५ वाजता निधन झाले. वाजपेयी यांच्या पार्थिवावर राजघाटाजवळील राष्ट्रीय सृतीस्थळी लष्करी इतमामात आज शुक्रवारी सायंकाळी...
Read More
post-image
महाराष्ट्र

वसईतील नुकसानग्रस्त रहिवासी आजही शासन मदतीपासून वंचित

वसई –  वसई तालुक्याच्या शहरी व ग्रामीण भागात जुलै महिन्यात मोठी अतिवृष्टी होऊन पावसाचे पाणी आणि सोबत पुराचे पाणी चक्क नागरिकांच्या घरात,दुकानात रस्त्यावर आदी ठिकाणी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

‘इसोव’नी रचला भारतासाठी नवा इतिहास 

नवी दिल्ली – स्वित्झर्लंड मध्ये सुरु असलेल्या जागतिक अजिंक्यपद सायकल स्पर्धेत अंदमान निकोबारच्या अवघ्या १७ वर्षीय इसोव अल्बानने रौप्य पदक जिंकून भारतासाठी नवा इतिहास...
Read More
post-image
महाराष्ट्र

माळशेज घाटात पर्यटकांची झुंबड

मुरबाड – पर्यटकांच्या सुरक्षितेच्या हेतूने ठाणे जिल्ह्याचे तात्कालीन कार्यरत  जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी जिल्ह्यातील पावसाळी पर्यटन स्थळ माळशेज घाटातील सर्व  धबधबे व इतर पर्यटक स्थळांवर...
Read More