राजकीय जाहिरातींवर ‘गुगल’ची नजर असणार – eNavakal
देश निवडणूक

राजकीय जाहिरातींवर ‘गुगल’ची नजर असणार

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुका जवळ आल्याने प्रत्येक राजकीय पक्षांची प्रचार करण्यास सुरुवात होते. एकदा आचारसंहिता लागू झाली की, पक्षांना कोणत्याही दूरदर्शन किंवा वर्तमानपत्रात जाहिराती करण्यास सक्त मनाई असते. तरीही काही पक्ष हे प्रचार करणाऱ्या जाहिराती प्रकाशित करत असतात. डिजिटल जाहिरातींवरदेखील निवडणूक आयोगाचे लक्ष असते. २०१९ च्या निवडणुकांवेळी या डिजिटल जाहिरातींवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाला ‘गुगल’ मदत करणार आहे.

गुगलने निवडणूक आयोगाला खात्री दिली आहे की, कंपनी अशा जाहिरातींचे तपशील देईल. यासोबतच जाहिरातींवर किती खर्च करण्यात आला आहे हे देखील ट्रॅॅक करून त्याचे तपशील आयोगाला पुरविणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे प्रत्येक उमेदवाराने निवडणुकीसाठी किती खर्च केला आहे याबाबतची माहिती घेण्यासाठी आयोग अधिकाऱ्यांना मदत होणार आहे.

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

वसईत बीएसएनएलची इंटरनेट सेवा ठप्प

वसई – बीएसएनएलच्या इंटरनेटचे सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्यामुळे वसईतील दस्त नोंदणी रखडत चालली असून त्याचा फटका मात्र दररोज नोंदणी कार्यालये व त्याच्या लाखो...
Read More
post-image
News मुंबई

पालिकेचा केंद्र शासनाच्या ‘डिजिटल इंडिया’ पुरस्काराने सन्मान

मुंबई – पालिकेद्वारे नागरिकांना देण्यात येणार्‍या विविध सेवा सुविधा नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने सहजपणे उपलब्ध व्हाव्यात, विविध परवानग्या, दाखले, अनुज्ञप्ती पत्रे यासारख्या सेवा सुविधा माहिती...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पालिकेच्या रुग्णालयातील एक्स-रे मशीन कोमात

वसई- वसई-विरार महापालिकेच्या नालासोपार्‍यातील रुग्णालयाची एक्स-रे मशीन महिनाभरापासून नादुरुस्त असून आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे गोरगरीब रुग्णांना हजारो रुपयांचा भुर्दंड हकनाक सोसावा लागत आहे. नालासोपारा पुर्वेकडील...
Read More
post-image
News विदेश

‘जैश’चे मुख्यालय पाकिस्तानने घेतले ताब्यात

इस्लामाबाद – भारताच्या कारवाईच्या भीतीने पाकिस्तानने जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय ताब्यात घेतले आहे. मौलाना मसूद अजहरच्या जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय बहावलपूरमध्ये आहे. पंजाब सरकारने हे मुख्यालय ताब्यात घेतल्याची...
Read More
post-image
News महाराष्ट्र

प्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालयात

महाड- शिवप्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांना रक्तदाब कमी झाल्याचा त्रास झाल्याने महाड येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. आज सायंकाळच्या सुमारास...
Read More