परभणी – पावसाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात राज्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्यांवरून विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा आपल्या खास शैलीत सरकारवर हल्लाबोल केला आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यात रस्त्यावर एवढे खड्डे पडले आहेत की, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड त्याची दखल घेईल असा मिश्किल टोला लगावला रस्ते दुरूस्तीवर मागील चार वर्षात खर्च केलेले हजारो कोटी रूपये नेमके कुणाच्या खिशात गेले ? असा सवाल हि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना केला आहे.
मागील वर्षी प्रमाणेच या वर्षीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांनी ‘सेल्फी विथ खड्डे’ हे ट्विटरच्या माध्यमातून आंदोलन सुरू केले आहे. याच आंदोलनात उडी घेत धनंजय मुंडे यांनी ही शनिवार दि. १ सप्टेंबर रोजी खड्यासोबत सेल्फी घेऊन तो आपल्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट केला आहे. शनिवारी वाशिम येथे एका कार्यक्रमाला जात असताना गंगाखेड-परभणी या रस्त्यावर पडलेल्या खड्यांसमवेत त्यांनी हा सेल्फी घेऊन चंद्रकांत दादा हे पहा रस्त्यांवरील खड्डे असे म्हणत ट्विट केले आहे.
मागील आठवड्यातही शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या गाडीचे टायर फुटले होते, तेंव्हा ही धनंंजय मुंडे यांनी चंद्रकांत दादा खड्डा दाखवा बक्षिस मिळवा या योजनेतील हजार रूपये आता मित्र पक्ष असलेल्या शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांना ही पाठवा असा टोला लगावयाला हि धनंंजय मुुंडेे विसरलेे नाही. यानंतर धनंंजय मुुंडे हेे वाशिम ला रवाना झाले.