रशियाच्या राष्ट्रध्यक्षांनी केली समारोपाची घोषणा – eNavakal
देश विदेश

रशियाच्या राष्ट्रध्यक्षांनी केली समारोपाची घोषणा

 मॉस्को- रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सीरियात आयसिस विरुद्धच्या कारवाईचा समारोप झाल्याची घोषणा केली. सीरियाच्या हेमिमीम हवाई तळावर पुतिन यांनी ही घोषणा केली आहे. यासोबतच, त्यांनी सीरियातील रशियन निरीक्षकांना आणि हवाई दलास परतीचे आदेश दिले आहेत. यावेळी उपस्थित असलेले रशियाचे संरक्षण मंत्री सेरजी शोइगू यांनी सांगितल्याप्रमाणे, आमच्या सैनिकांना अवघ्या 2 वर्षांत आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना आयसिसचा नायनाट केला. पुतिन यांचा हा पहिलाच रशिया दौरा आहे.

सीरियात गेल्या 6 वर्षांपासून सुरू असलेल्या यादवी आणि संघर्षात किमान 4 लाख 65 हजार नागरिकांचा बळी गेला आहे. आंतरराष्ट्रीय शरणार्थी संघटनेचे उपाध्यक्ष अब्दुल्ला रसूल देमीर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, त्या सर्वांचा मृत्यू युद्धातील हल्ल्यांत आणि तुंरुंगांमध्ये झाला आहे.  सीरियातील यादवी आणि नरंसहार हा शतकातील सर्वात क्रूर अमानवीय अत्याचार आहे. तरीही मोठ-मोठे देश आपल्या डोळ्यांवरील पट्टी सुद्धा काढायला तयार नाहीत. देमीर यांनी ही आकडेवारी मार्च 2011 ते नोव्हेंबर 2017 पर्यंत गोळा केलेल्या माहितीच्या आधारे जारी केली. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये 26, 466 लहान मुलांचाही समावेश आहे. तसेच 1 कोटी 30 लाख लोकांनी घर सोडून दुसऱ्या देशांत किंवा सीमेवर शरण घेतली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

वर्सोवा ते लोखंडवाला रस्त्याच्या बांधकामात कांदळवनांचा बळी

मुंबई – मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी वर्सोवा ते लोखंडवाला लिंक रोड एमएमआरडीएच्या वतीने बांधण्यात येणार आहे. परंतु या मार्गासाठी कांदळवनांचा बळी जाणार असल्याचा...
Read More
post-image
News मुंबई

पालिका प्रसूतीगृहांमध्ये बसवणार सीसीटिव्ही कॅमेरे

मुंबई – देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणार्‍या मुंबई पालिकेने आपल्या रुग्णालय व प्रसूतीगृहांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या रुग्णालयातून नवजात...
Read More
post-image
News मुंबई

मुंबईत सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानकाचा मान ‘मुंबई सेंट्रल’ला मिळाला

मुंबई – मुंबई शहरातील सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानक म्हणून ‘मुंबई सेंट्रल’चे नाव समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यवरणपूरकतेच्या तब्बल 12 कसोट्यांवर पात्र ठरल्याने मुंबई सेंट्रल...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुरामुळे साखर महाग झाली दुसर्‍यांदा दरवाढ! 40 रुपये किलो

कोल्हापूर – पूरस्थिती पूर्णपणे निवळत चालली असली तरी या कोल्हापूर आणि सांगलीच्या पुराचा फटका साखरेला बसला आहे. साखरेचे भाव दुसर्‍यांदा वाढले आहेत. मागील आठवड्यात...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

राज्यातील महापूर प्रशासकीय गलथानामुळे आरोप करणारी जनहित याचिका हायकोर्टात

मुंबई – कोल्हापूर, सांगलीसह राज्यात उद्भवलेली महापूरस्थिती ही प्रशासकीय गलथानपणा आणि धरणातील पाणी सोडण्यासंदर्भात केंद्रीय जल आयोगाच्या निर्देशांचे बेदरकार उल्लंघन झाल्याचा आरोप करून कर्नाटक...
Read More