रविवार मध्य व हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक – eNavakal
News मुंबई

रविवार मध्य व हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक

मुंबई – मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेच्या उपनगरीय खंडावर अनुरक्षण कार्य करण्यासाठी रविवार 14 जुलै 2019 रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
कल्याण-ठाणे अप जलद मार्गावर सकाळी 11.20 पासून ते दुपारी 3.50 वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे. सकाळी 10.54 पासून दुपारी 3.52 वाजेपर्यंत कल्याणहून सुटणार्‍या अप जलद मार्गाच्या सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर चालविण्यात येतील आणि सर्व स्थानकांवर थांबतील. त्यानंतर ठाणे आणि सीएसएमटी स्थानकादरम्यान आपल्या निर्धारित अप जलद मार्गावर चालविण्यात येईल. या सेवा मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर आणि भायखळा स्थानकावर थांबतील तसेच या गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा 20 मिनिटे उशिरा शेवटच्या स्थानकांवर पोहचतील.
तर हार्बर मार्गावरही मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पनवेल-वाशी अप व डाऊन हार्बर मार्गावर आणि नेरूळ, बेलापुर-खारकोपर अप व डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.30 वाजल्यापासून सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत
सकाळी 11.06 वाजल्यापासून ते दुपारी 04.01 वाजेपर्यत पनवेलहून सीएसएमटीसाठी आणि सकाळी 10.21 ते दुपारी 3.41 वाजेपर्यत वाशीहून पनवेल, बेलापुर येथे जाणार्‍या सर्व उपनगरीय सेवा रद्द राहतील. ब्लॉक काळात पनवेल-अंधेरी उपनगरीय सेवा रद्द राहतील. बेलापुर, नेरूळ-खारकोपर मार्गांवर सकाळी 11.14 वाजल्यापासून ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत ठाणेहून पनवेलसाठी आणि सकाळी 10.12 ते दुपारी 3.53 वाजेपयर्र्ंत पनवेलहून ठाण्यासाठी सुटणार्‍या ट्रान्सहार्बर मार्गाच्या सेवाही रद्द राहतील. या ब्लॉक काळात सीएसएमटी मुंबई-वाशी खंडावर विशेष सेवा चालविण्यात येतील.

‘परे’वर जम्बो ब्लॉक
पश्चिम रेल्वेवरही रविवार, 14 जुलै रोजी मरिन लाईन्स ते माहिम स्थानकांदरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 10.35 वा.पासून ते दुपारी 3.35 वाजेपयर्र्ंत मरिन लाईन्स ते माहिम जंक्शन स्थानकादरम्यान डाऊन धीम्या मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळात डाऊन मार्गावरील सर्व धीम्या लोकल मरिन लाईन्सहून माहिम जंक्शनदरम्यान डाऊन जलद मार्गावर चालविण्यात येणार आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
निवडणूक महाराष्ट्र

राज्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५० टक्के मतदान

मुंबई – राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ७ वाजता मतदानास सुरुवात झाली असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही प्रक्रिया...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

चंद्रकांत पाटलांची कोथरुड-कोल्हापुरात ये-जा

कोल्हापूर – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे उमेदवार चंद्रकात पाटलांनी आज कोथरुड आणि कोल्हापूरमध्ये ये-जा केली. सकाळी त्यांनी आपल्या मतदारसंघाचा आढावा घेतला आणि दिवसभर तिथेच थांबले....
Read More
post-image
मनोरंजन

माध्यमांची गर्दी पाहून जया बच्चन संतापल्या

मुंबई – बॉलिवूडचे शहेनशहा अभिताभ बच्चन यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी अभिनेत्री व खासदार जया बच्चन यांना प्रसिद्धी माध्यमांनी गराडा घालताच त्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती नाही

नवी दिल्ली – आरेतील वृक्षतोडीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने वृक्षतोडीवरील स्थगिती कायम ठेवली असून आरेतील किती झाडे तोडली आणि त्याबदल्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

गडचिरोलीत कडेकोट बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पूर्ण

गडचिरोली – १३ व्या राज्य विधानसभेसाठी आज राज्यभरात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. गडचिरोली जिल्ह्यातही आज सकाळी ७ वाजल्यापासून कडेकोट बंदोबस्तात मतदान सुरू झाले...
Read More