रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गांवर मेगा ब्लॉक – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गांवर मेगा ब्लॉक

मुंबई – मध्य रेल्वेच्या कुर्ला-शीव स्थानकांदरम्यान रोड ओव्हर पुलाचा गर्डर टाकण्यासाठी आज शनिवारी आणि उद्या रविवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच कर्जत स्थानकातील झाड कापण्याठी विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. आसनगाव-कसारा मार्गावर पादचारी पुलाचा गर्डर टाकण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. यासह मध्य रेल्वेने मध्य-हार्बर मार्गावरही ब्लॉक घोषित केले आहेत. पश्चिम रेल्वेवरही बोरिवली-गोरेगाव स्थानकांदरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.

दरम्यान, मध्य रेल्वेच्या कुर्ला-शीव स्थानकांदरम्यान मध्यरात्री १ ते पहाटे ४ यावेळेत अप-डाऊन धीम्या आणि जलद मार्गावर तर कुर्ला-वाशी स्थानकांदरम्यान सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० वाजता अप आणि डाऊन मार्गावर, कर्जत स्थानकात सकाळी १०.४० ते दुपारी १.४० या वेळेत फलाट क्रमांक एक अपवर, बोरिवली-गोरेगाव स्थानकांदरम्यान सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजता अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, आसनगाव-कसारा स्थानकांदरम्यान सकाळी १०.५० ते दुपारी १२.५० वाजता, माटुंगा-मुलुंड स्थानकांदरम्यान सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० वाजता डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कॉंग्रेसचा गोंधळ समजू शकतो पण शरद पवार तुम्ही? मोदींचा हल्लाबोल

नाशिक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने आज नाशिकमध्ये झाला. यावेळी पंतप्रधानांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मलिष्का पुन्हा म्हणतेय, ‘मुंबईssss’

मुंबई – मुंबई…तुला बीएमसीवर भरवसा नाय काय आणि गेली गेली मुंबई खड्ड्यात असे म्हणत मुंबई महापालिकेवर उपहासात्मक टीका करणारी आर जे मलिष्का पुन्हा एकदा...
Read More
post-image
मुंबई वाहतूक

घाटकोपर रेल्वे स्थानकात ‘हे’ बदल होणार

मुंबई – घाटकोपर आणि अंधेरी स्थानकात मेट्रो आणि उपनगरीय रेल्वे एकमेकांशी जोडलेली आहे. या दोन स्थानकातील प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे घाटकोपर...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

गिरीश महाजन म्हणतात…आम्ही विरोधक म्हणून कशी आंदोलनं करायचो

नाशिक – आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपाच्या महाजनादेश यात्रेचा समारोप नाशिकमध्ये पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात जय्यत तयारी करण्यात आली असून अनेक...
Read More