रविवारी मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक – eNavakal
News मुंबई

रविवारी मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक

मुंबई-मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी रविवार 11 ऑगस्ट रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेच्या मुलुंड-माटुंगा अप जलद मार्गावर सकाळी 11.15 वा. पासून ते सायंकाळी 4.15 वा.पर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याणहून सकाळी 10.37 पासून दुपारी 3.56 वा.पर्यंत अप जलद मार्गावर निघणार्‍या सर्व उपनगरीय सेवा दिवा आणि परळ स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. तसेच सीएसएमटीहून सकाळी 10.05 पासून दुपारी 3.22 पर्यंत प्रस्थान करणार्‍या डाऊन मार्गावरील जलद गाड्या आपल्या निर्धारित थांब्या व्यतिरिक्त घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, मुलुंड आणि दिवा स्थानकावर थांबतील. रत्नागिरी-दादर पॅसेंजर गाडी दिवा स्थानकावर थांबवण्यात येणार आहे. तर कुर्ला-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.34 ते सायंकाळी 4.10 वा.पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या काळात सीएसएमटीहून सकाळी 11.34 वाजल्यापासून दुपारी 3.39 वा.पर्यंत वाशी, बेलापूर, पनवेल यीेथे जाणार्‍या तसेच पनवेल, बेलापूर, वाशीहून सकाळी 10.21 ते दुपारी 3.41 वा. पर्यंत सीएसएमटी येथे जाणार्‍या सर्व उपनगरीय सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मराठीत बोलायला सांगितल्याने कुरियर बॉयचा तरुणींवर हल्ला

मुंबई – आज सकाळी 11.30 वाजता दादरच्या न.चिं. केळकर रोडवरील गुरुकृपा अपार्टमेंटमध्ये राहणार्‍या पेडणेकर भगिनींच्या घरी कुरियरवाला आला. या भगिनींनी कुरियरद्वारे स्वामी समर्थांची पुस्तके मागविली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मध्य प्रदेशात पबजीवर बंदी आणण्याचा विचार

भोपाळ – अलिकडे स्मार्ट मोबाईल फोनवर पबजी खेळ खेळण्याचा जीवघेणा छंद वाढीस लागला आहे. हा खेळ खेळता खेळता अनेकांना त्याचे व्यसन लागत आहे. त्यामुळे तरुणाईला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

‘क्रोकोडाइल हंटर’ स्टीव्ह यांना गुगलची आदरांजली

नवी दिल्ली – ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध पशूप्रेमी स्टीव्ह इरविन यांची आज 57 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त गुगलने खास डुडल तयार करून त्यांना मानवंदना दिली आहे. स्टीव्ह इरविन यांना ‘क्रोकोडाइल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना उत्तर प्रदेशात अटक

सहारनपूर – सहारनपूर जिल्ह्यातील देवबंद येथून जैश ए मोहम्मदच्या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील दहशतवादविरोधी पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली. या संशयितांकडून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

प्रियांका-फरहानच्या ‘स्काय इज पिंक’ची तारीख ठरली

मुंबई – अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि अभिनेता फरहान अख्तर यांचा आगामी चित्रपट ‘स्काय इज पिंक’ कधी प्रदर्शित होणार याविषयी चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. पण आता...
Read More