आंदोलन महाराष्ट्र

रत्नागिरी शहरातील पाणीप्रश्नाचा वाद पेटला

रत्नागिरी- रत्नागिरी शहरातील पाणीप्रश्नाचा वाद आता चांगलाच पेटला आहे. शिवसेनेने यावरून थेट भाजपला लक्ष केलं आहे. रत्नागिरी नगर परिषदेसाठी शासनाच्या नगरोत्थानमधून 64 कोटीची सुधारित नळपाणी योजना मंजूर झाला आहे. मात्र ही योजना थांबवण्याचे काम खऱ्या अर्थाने भाजपा करत आहेत. हि योजना मार्गी लावण्याचे श्रेय शिवसेनेला मिळू नये यासाठीच भाजपावाले शहरातील नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवत असल्याचा आरोप शिवसेना रत्नागिरी तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी केला आहे.

आज शहरातील नागरिकांना पाणी पाणी करण्याची वेळ भाजपाच्या सूडाच्या राजकारणामुळे आल्याचा आरोपही बंड्या साळवी यांनी केला आहे. तसेच याबाबत येत्या 2 दिवसांत निर्णय न झाल्यास नगर परिषदेचे सर्व नगरसेवक, सर्व आमदार कोकण आयुक्तांसमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

कारण पाणीपुरवठा खंडीत होत असल्याने नागरिकांची मोठी ओरड सुरू आहे. त्याबाबत तालुकापमुख बंड्या साळवी, नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, शहराला 64 कोटीची सुधारित पाणीपुरवठा योजना मंजुर झाली. त्यानंतर सन 2015-16 च्या डिएसआरपमाणे सुमारे 54 कोटी 41 लाखाचे अंदाजपत्रक करण्यात आले होते. त्यामुळे वाढीव 9 कोटीच्या अंदाजपत्रकाला विरोधकांनी आक्षेप घेतला. त्यानंतर झालेल्या घडामोडीनंतर विरोधकांनी स्थगिती घेण्याचा पवित्रा घेतल्याचे बंड्या साळवी यांनी सांगितले.

विभागीय आयुक्तांकडे 8 नोव्हेंबर 2017 मध्ये अर्ज सादर करण्यात येऊन त्यावर स्थगितीही घेण्यात आली. नगर परिषदेतील सर्व विरोधी पक्षांच्या गटनेते व नगरसेवकांनी ही योजना नामंजूर होण्याची भूमिका घेतली. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याच्या समस्येला हे विरोधकच जबाबदार असल्याचा आरोप साळवी यांनी घेतला आहे. ही योजना मार्गी लावण्यासाठी शिवसेनेच्यावतीने तसेच पक्षपमुख उध्दव ठाकरे यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली पण निर्णय झालेला नाही. योजनेसाठी आलेले पैसे परत जाण्याचा संभव निर्माण झाला आहे. शहरातील पाण्याचा पश्नही गंभीर बनलेला आहे. कोकण आयुक्तांनी योजनेच्या कार्यवाहीसाठी चार तारखा दिल्या होत्या. त्यावरही कार्यवाही झालेली नसल्याचे सांगण्यात आले. मुख्यमंत्र्यांशीही नगराध्यक्षांनी दोन वेळा चर्चा केलेली आहे. मात्र ही 64 कोटीची योजना थांबवण्याचे काम खऱया अर्थाने भाजपा व त्यांचे सर्व लोकपतिनिधी करत असल्याचा जोरदार आक्षेप तालुकाप्रमुख तथा नगरसेवक बंडया साळवी यांनी घेतला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
क्रीडा

मुंबई पराभवाचा बदला घेणार का?

मुंबई – आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेत उद्या वानखेडे स्टेडियम वर होणार्‍या हैदराबादविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माचा मुंबई संघ आपल्या मागील पराभवाचा बदला घेणार का? याबाबत मुंबईच्या...
Read More
post-image
क्रीडा

पंजाबने पुन्हा केली दिल्लीवर यशस्वी स्वारी

नवी दिल्ली- आर अश्विनच्या पंजाब संघाने आज येथे झालेल्या आयपीएल स्पर्धेतील परतीच्या लढतीत पुन्हा एकदा दिल्लीवर यशस्वी स्वारी केली. दिल्लीच्या घरच्या मैदानात झालेल्या या...
Read More
post-image
क्रीडा

ज्योत्स्नाचा निकोलवर सनसनाटी विजय

इल गुव्हाना – भारताची स्टार महिला स्क्वॉशपटू ज्योत्स्ना चिनप्पाने येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धेत जागतिक क्रमवारीत माजी अव्वल क्रमांकावर असलेल्या मलेशियाचा निकोल डेव्हिडचा सनसनाटी...
Read More
post-image
क्रीडा

रैनाने पुन्हा विराटला मागे टाकले

हैदराबाद – आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सुरेश रैनाने पुन्हा एकदा भारतीय कर्णधार विराट कोहलीला मागे टाकून सर्वाधिक धावांचा विक्रम आपला नावावर लावला. हैदराबाद विरुद्ध झालेल्या सामन्यात...
Read More
post-image
News मुंबई

बेकायदा बांधकामांना मालमत्ता कर रक्कमेच्या दुप्पट दंड

मुंबई –  मुंबईतील अनधिकृत बांधकामांवरील दंड आकारणीबाबत राज्यातील सर्व महापालिकांमध्ये एक वाक्यता असावी. अल्प उत्पन्न गटातील घटकांना न्याय मिळावा, म्हणून शासनाने अध्यादेश जारी केला...
Read More