रत्नागिरी नगरपालिकेच्या सभेत खडाजंगी; विरोधक आक्रमक – eNavakal
महाराष्ट्र

रत्नागिरी नगरपालिकेच्या सभेत खडाजंगी; विरोधक आक्रमक

रत्नागिरी – शाळेसाठी आरक्षित असलेला भुखंड खासदार विनायक राऊत हे अध्यक्ष असलेल्या श्री रामेश्वर शिक्षण संस्थेला देण्यावरून आज  रत्नागिरी नगर परिषदेच्या सभेत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. शहरात नामवंत संस्था असताना मुंबई येथील शिक्षण संस्थेला नाममात्र दराने भुखंड का द्यायचा असा सवाल भाजपा, राष्ट्रवादी नगरसेवकांनी यावेळी उपस्थित केला. यावरुन सत्ताधारी विरोधक यांच्यात शाब्दिक खडाजंगी उडाली. अखेर सत्ताधार्यांनी बहुमताच्या जोरावर ठराव मंजुर केला.

खासदार विनायक राऊत हे अध्यक्ष असलेल्या श्री.रामेश्वर शिक्षण संस्था मुंबई यांनी रत्नागिरी पालिकेकडे नवीन शाळा सुरु करण्यासाठी जागेची मागणी केली होती. थिबा पॅलेस नजीक कर्लेकरवाडी येथे डीपी साईट नंबर 84 हा शाळेसाठी आरक्षित असलेला भुखंड रामेश्वर संस्थेला देण्याबाबतचा ठराव अजेंड्यावर घेण्यात आला होता. ठरावाचे वाचन झाल्यानंतर राष्ट्रवादी, भाजपा नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला. आरक्षित भुखंड देण्याचा अधिकार राज्य सरकारला असताना पालिका नगरसेवकांनी ठराव का करायचा असा मुद्दा गटनेते सुदेश मयेकर, समीर तिवरेकर यांनी उपस्थित केला. नवीन शाळा सुरु करण्यासाठी शहरासह जिल्ह्यात नामवंत शिक्षण संस्था आहेत. मात्र त्याची दखल न घेता मुंबईच्या श्री रामेश्वर शिक्षण संस्थेला भुखंड देण्याची आवश्यकता का? असा प्रश्न उपस्थित करत विनायक राऊत यांच्या दबावाखाली पालिकेतील सत्ताधारी भुखंड देण्याचा ठराव करत असल्याचा आरोप भाजपा नगरसेवकांनी केला.

विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे अखेर नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी ठरावासाठी मतदान घेतले. 17 विरुद्ध 13 मतांनी ठराव मंजुर करून घेतला, हा ठराव राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे आता रत्नागिरी नगर पालिकेतील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये या विषयावरून संघर्ष होण्याची चिन्ह आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

खलिस्तान निर्मितीचा पुरस्कर्ता अटक

मुंबई,  – खलिस्तान निर्मितीचा पुरस्कर्ता असलेल्या एका 45 वर्षांच्या संशयित आरोपीस पुणे एटीएसने अटक केली आहे. त्याचा दहशतवादी कृत्यामध्ये सहभाग असल्याचे काही पुरावे एटीएसच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

चार मराठी चित्रपटांची महिनाभरात 50 ते 60 कोटींची कमाई

मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीला यशाचे प्रभावी टॉनिक मिळाले आहे. …आणि डॉ. काशिनाथ घाणेकर, नाळ, मुळशी पॅटर्न आणि मुंबई-पुणे-मुंबई 3 या चारही चित्रपटांनी यशाचा चौकार मारला....
Read More
post-image
News मुंबई

पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना मुदतवाढ

मुंबई,- राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना सेवत देण्यात आलेल्या मुदतवाढीचे राज्य सरकारने आज समर्थन केले. त्यांना दिलेली मुदतवाढ ही राज्य आणि केंद्र सरकारने...
Read More
post-image
क्रीडा

बेलेच्या गोलामुळे माद्रिदचा विजय

माद्रिद – स्पॅनिश साखळी फुटबॉल स्पर्धेत बलाढ्य रियल माद्रिदने बेलेने नोंदवलेल्या एकमेव गोलांच्या जोरावर शानदार विजय मिळवला. माद्रिदने आपल्या साखळी लढतीत तळाला असलेल्या ह्यूसेका...
Read More
post-image
Uncategoriz

मुंबई विमानतळावरून 24 तासांत तब्बल 1004 विमाने ये-जा झाली

मुंबई – सर्वाधिक वर्दळ असलेला विमानतळ म्हणजे मुंबई विमानतळ. स्वतःचाच विक्रम मुंबई विमानतळाने पुन्हा एकदा मोडीत काढला, 8 डिसेंबरला 24 तासात मुंबई विमानतळावर 1004...
Read More