रत्नागिरीत प्रकल्पग्रस्तांचे ‘ठिय्या’; मुख्यमंत्री बैठक घेत नाहीत तोपर्यंत माघार नाही – eNavakal
आंदोलन महाराष्ट्र

रत्नागिरीत प्रकल्पग्रस्तांचे ‘ठिय्या’; मुख्यमंत्री बैठक घेत नाहीत तोपर्यंत माघार नाही

रत्नागिरी – श्रमिक मुक्ती दलाकडून राज्यातल्या नऊ जिल्ह्यात पाटबंधारे आणि अभयारण्य प्रकल्पग्रस्तांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे. पुनर्वसन, जमिनीचा मोबदला, प्रकल्पग्रस्ताना नोकरी आणि अन्य मागण्या घेऊन रत्नागिरी जिल्ह्यातही या प्रकल्पग्रस्तानी गेल्या तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन सुरु केले आहे. स्थानिक प्रश्न जोपर्यंत सुटत नाहीत आणि या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री जोपर्यंत बैठक घेत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचं संघटनेच्या वतीने आज पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले आहे.

कोयना, गडनदी धरण प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली येथील प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन छेडले आहे. आज आंदोलनाचा तिसरा दिवस. कोयना प्रकल्पाला 60 वर्षे झाली पण चिपळूण येथील प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या मागण्यांना शासन, प्रशासनस्तरावरूनही हरताळ फासला जात आहे, त्यामुळे हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
कोयना प्रकल्पग्रस्त स्तर 3 अंतर्गंत संपादीत शासकीय ‘क’ पत्रकाप्रमाणे उर्वरित 87 प्रकल्पग्रस्तांना रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन किंवा समाधानकारक आर्थिक पॅकेज मिळावे अशी मागणी आहे. कोयना प्रकल्पग्रस्त स्तर 4 अंतर्गंत संपादीत झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी बाबत पर्यायी शेतजमीन किंवा आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात यावे अशीही प्रमुख मागणी आहे.

कोयना पकल्पग्रस्त स्तर 3 प्रमाणे कोयना प्रकल्पस्तर 4 चे शासकीय ‘क’ पत्रक तयार करण्यात यावे. कोयना प्रकल्पस्तर 3 व 4 च्या प्रकल्पग्रस्तांना संपादीत जमिनीचे प्रकल्प दाखले (20 गुठे जमिनीचे ) अट न लावता देण्यात यावेत. तसेच कोयना प्रकल्पस्तर 3 व 4 करिता स्वतंत्र दोन पकल्पग्रस्त दाखले देण्यात यावेत अशा अनेक मागण्यांचा समावेश आहे. तसेच विस्थापितांच्या घरांसाठी 65% रक्कम भरुन घेण्याचा नियम असतानाही या विस्थापितांकडून रक्कम भरुन घेतली जात नाहीच पण शेती आणि रोजगार गमावलेल्या या प्रकल्पग्रस्ताना रोजगार हमी योजनेचीही कामे मिळत नसल्यामुळे हे प्रकल्पग्रस्त दैन्यावस्थेत आहेत . रत्नागिरी जिल्ह्यात पाच प्रकल्पातुन मिळून जवळपास साडेसहाशे विस्थापितांचे पुनर्वसन अजूनही झालेलं नसून त्यासाठी बेमुदत ठिय्या पुकारण्यात आला आहे..

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

विधान परिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. नीलम गोऱ्हेंची बिनविरोध निवड

मुंबई – विधान परिषदेतील उपसभापतीपदी अखेर शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच विधानसभा विरोधी पक्षनेता म्हणून काँग्रसेचे गटनेते विजय वडेट्टीवार यांना देण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षणावर गुरुवारी अंतिम निर्णय

मुंबई – महाराष्ट्र सरकारने राज्यातील मराठा समाजाला दिलेले १६ टक्के आरक्षण कायदेशीर आहे की, बेकायदेशीर आहे याचा निकाल मुंबई उच्च न्यायालय गुरुवारी २७ जूनला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या न्यायालय महाराष्ट्र

डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आरोपी डॉक्टरांना जामीन नाही

मुंबई – नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या डॉ. भक्ती मेहेर, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबई-पुणे महामार्ग उद्या अर्धा तास बंद राहणार

मुंबई – पुणे-मुंबई मार्गावर परंदवाडी येथे महावितरणची ओव्हरहेड हायटेंशन केबल तुटली असून तिचे काम करण्यासाठी उद्या पूर्ण रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या...
Read More
post-image
मुंबई

मुंबई महापालिका मुख्यालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई – एका ३० वर्षीय तरुणाने मुंबई महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनासमोर आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सुदाम शिंदे असे या तरुणाचे नाव असून...
Read More