रत्नागिरीत पाण्याची बोंब! एकदिवसाआड मिळणार नागरिकांना पाणी – eNavakal
महाराष्ट्र

रत्नागिरीत पाण्याची बोंब! एकदिवसाआड मिळणार नागरिकांना पाणी

रत्नागिरी – शहरात प्रचंड पाणीटंचाई निर्माण झाली असून एमआयडिसीच्या धरणांमधील पाणी साठाच संपुष्टात आल्याने १२ जूनपासून दोन दिवसाआड केवळ ५० टक्के पाणी पुरविले जाणार आहे. तसेच शीळ धरणात अवघा सोळा टक्के साठा उरले आहे. पाऊस लांबण्याची शक्यता असल्याने हा साठा संपल्यास शहरातील पाणी पुरवठ्यावर त्याचा गंभीर परिणाम होणार आहे. त्यामुळे बुधवारपासून शहराचे दोन विभाग करून प्रत्येक विभागाला शहरात दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. दरम्यान, रत्नागिरी नगर परिषदेची नळपाणी योजना जुनाट झाली आहे. नवीन योजनेचे काम सुरू असून ते पूर्ण होण्यास अजून वर्षभराचा कालावधी जाणार आहे.

पहिला विभाग 

निवखोल, राजिवडा, बेलबाग, गवळीवाडा, चवंडेवठार, घुडेवठार, मांडवी, संपूर्ण बाजारपेठ, वरची आळी, आठवडा बाजार, टिळक आळी, झाडगाव, मुरुगवाडा, खालची आळी, पेठकिल्ला, मिरकरवाडा, कीर्तीनगर, कोकणनगर फेज नं. ४

दुसरा विभाग 

पोलीस लाईन, वरचा फगरवठार, तांबट आळी, राहुल कॉलनी, आंबेडकरवाडी, सन्मित्रनगर, माळनाका, एस.व्ही.रोड, मारूती मंदिर, हिंदू कॉलनी, थिबा पॅलेस, विश्वनगर, आनंदनगर, अभ्युदयनगर, नूतननगर, नरहर वसाहत, उद्यमनगर, शिवाजीनगर, साळवी स्टॉप, छत्रपतीनगर, सहकारनगर, विष्णूनगर, नवलाईनगर, चार रस्ता मजगाव रोड, स्टेट बॅँक कॉलनी, म्युन्सिपल कॉलनी, राजपूरकर मार्ग.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

एमआयएमकडून मुंबईतील ५ उमेदवारांची यादी जाहीर

औरंगाबाद – एमआयएम पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील पाच उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. एमआयएम ‘वंचित’ आघाडीत सहभागी होईल अशी चर्चा होती. मात्र...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

युतीची चर्चा अंतिम टप्प्यात, चंद्रकांत पाटलांची माहिती

मुंबई – शिवसेना-भाजपा युतीची चर्चा शेवटच्या टप्प्यात असून, लवकरच जागावाटपाबाबत निर्णय होईल, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. तसेच युती न...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध

मुंबई – रिझर्व्ह बँकेने सहकार क्षेत्रातील पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध लादले आहेत. आर्थिक अनियमितता आढळून आल्याने हे निर्बंध लादण्यात...
Read More
post-image
देश

सलग आठव्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ

मुंबई – आज सलग आठव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात २२ पैशांनी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचा दर...
Read More