रत्नाकर गुट्टे हा छोटा नीरव मोदी – धनंजय मुंडे – eNavakal
News आघाडीच्या बातम्या

रत्नाकर गुट्टे हा छोटा नीरव मोदी – धनंजय मुंडे

नागपूर – परभणी जिल्हयातील गंगाखेड येथील गंगाखेड शुगर्सचे चेअरमन रत्नाकर गुट्टे यांनी २२ बोगस कंपन्या स्थापन करुन त्या माध्यमातून 26 हजार शेतकऱ्यांना व बँकांना कोटयवधी रुपयांना फसवल्याचा सर्वात मोठा घोटाळा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नियम २८९ अन्वये विधानपरिषदेमध्ये उघड केल्याने एकच खळबळ उडाली आहे.  गुट्टे व त्याच्या कुटुंबियांच्या नावे एकूण २२ कंपन्या नोंदणीकृत केल्याचे आढळून आले असून यापैकी बहुतांश कंपन्या या निव्वळ कागदावर असून काही कंपन्या निव्वळ सेल कंपन्या म्हणून काळा पैसा पांढरा करण्याचे व पैशांची फिरवाफिरव करण्याचे काम करते असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.
गुट्टे यांच्या गंगाखेड शुगर्स कारखान्याने हार्वेस्ट अँण्ड ट्रान्सपोर्ट योजनेखाली २०१५ मध्ये ६०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या नावे कर्जे उचलली. यापोटी शेतकऱ्यांना मिळालेली वाहने या कारखान्याला कामावर लावून कारखान्याकडे सर्व हप्त्यांची परतफेड करुनदेखील कारखान्याने या रकमा बँकांना परतफेड न केल्यामुळे या रकमा थकीत झाल्या त्यामुळे आता शेतकऱ्यांना २०ते २५ लाख रुपयांच्या वसुलीसाठी बँकांच्या नोटीसा येत असल्याची बाब समोर आणली.
गुट्टे यांनी यापूर्वीही शेतकऱ्यांच्या नावे शेकडो कोटी रुपयांचे पीककर्ज उचलल्याची व ती थकवल्याने बँकांनी शेतकऱ्यांकडून वसुलीचा तगादा लावल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. त्यासंदर्भात न्यायालयाने आदेश देवूनही अदयापपर्यंत कोणतीही कारवाई झाली नसल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.
सध्या गाजत असलेल्या डिएसके प्रकरणात डिएसके आणि त्यांच्या कुटुंबांवर भादंवि कलम ४२० ,४०६ व ३४ अशी कलमे लावण्यात आली असल्याची माहिती घेतल्याचे मुंडे यांनी सांगतानाच गुट्टे यांच्यावर ५ जुलै २०१७ रोजी भादंवि कलम ४०६, ४०९, ४१७ ,४२० आणि ४६७, ४६८, ४७१, १२०-ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. परंतु अटक करण्याबाबत कोणताही मनाई हुकुम नसताना गेले वर्षभर गुट्टे यांना अटक का करण्यात आली नाही.त्यांना का राजाश्रय देण्यात आला आहे असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.
गुट्टे यांनी त्यांच्या विविध कंपन्यांवर शून्य उलाढाल असतानाही बनावट कागदपत्रे तयार करुन सुमारे साडेतीन ते साडेपाच हाजार कोटी रुपयांची कर्जे घेतली असल्याचे निदर्शनास आणून दिले.कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १८६ ( २ ) मधील तरतुदीनुसार एखाद्या कंपनीला तिच्या पेडअप कॅपिटलच्या ६० टक्क्यांपेक्षा अधिक नाही किंवा प्रि रिझर्व्हच्या १०० टक्के या दोन्हींपैकी मोठी असलेल्या इतक्याच रकमा कॉर्पोरेट गॅरंटी देता येते अशी माहिती मुंडे यांनी सभागृहात दिली.
या कंपनीने एका कंपनीकडून कर्जावू रकमा घेवून त्या दुसऱ्या कंपनीला कर्जरुपाने दिल्या आहेत. सदरचे व्यवहार हे रिझर्व्ह बँकेच्या कुठल्याही परवान्याविना झालेला असल्याने यात बँकिंग रेग्युलेशन अँक्टमधील तरतुदीचे गंभीर उल्लंघन झाल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.  यावेळी मुंडे यांनी गुट्टे यांच्या परिवाराच्या विविध ८ कंपन्या आणि त्यांनी घेतलेली कर्जे याची आकडेवारी सभागृहात सादर केली.
एका एका शेतक-याच्या नावे 40 -40 लाख उचलले. पोलीस तक्रारी घेत नाहीत, गुट्टेची माणसे गुंडगिरी करतात असे सांगत या व्यक्तीने देशातल्या एकाही बँकेला सोडले नाही. न्यायमूर्तीच्या मयत भावाच्या नावे बनावट कर्ज उचलले असा आरोप त्यांनी केला.  रत्नाकर गुट्टे हा महाराष्ट्रातला नीरव मोदी आहे.  उद्या तो देश सोडून पळून जाईल त्याला सरकारचा पाठिंबा, राजाश्रय आहे असा आरोप त्यांनी केला. दरम्यान रत्नाकर गुट्टे यांना अटक कधी करणार आहे अशी विचारणा करत त्यांची संपत्ती जप्त करण्याची मागणी  धनंजय मुंडे यांनी केली.
यावर वोलताना सभापती म्हणाले कि, हे  प्रकरण ऐकून स्वतः सभापती रामराजे निंबाळकर हे स्तभ झाले, हा विषय गंभीर असून गुट्टे ला अटक का होत नाही याचे सरकारने स्पष्ट करावे, sit मार्फत तपास नीट होत नसेल तर पुन्हा वेगळी एसआयटी  स्थापन करावी अशा सूचना दिल्या. या विषयावर सभागृहात चर्चा करण्यासाठी स्वतंत्र वेळ देण्याचे आश्वासन त्यांनी दिले

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात आज २०९१ नवे रुग्ण; आतापर्यंत १६ हजाराहून अधिक जण कोरोनामुक्त

मुंबई -राज्यात आज नव्या २०९१ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून २४ तासांत ९७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज ११६८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

ज्याला आम्ही ताब्यात घेतलं होतं त्याला भारताने हिरो बनवलं – शाहिद आफ्रिदी

नवी दिल्ली – भारतीय हवाई दलाचा अधिकारी अभिनंदन वर्थक यांचा उल्लेख करत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने  भारतावर बोचरी टीका केली आहे. ज्याचं विमान...
Read More
post-image
ट्रेंडिंग

आता घाला स्वतःच्याच चेहऱ्याचा प्रिंटेड मास्क

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर वापरणं गरजेचं आहे. अशातच मास्कच्या अनेक नवनव्या डिजाईन बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. काही फॅशन डिझायनरने स्टयलिश असे मास्क...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

धारावीत सोशल डिस्टंसिंगचा फज्जा; गावी जाण्यासाठी मजुरांच्या लांबच लांब रांगा

मुंबई – कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धावारीत आज मजुरांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. गावी जाण्यासाठी हजारो मजूर येथे जमले होते. त्यामुळे मजुरांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या राजकीय

…तर त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ नये; नवाब मलिक यांचा विरोधकांवर घणाघात

मुंबई – ‘ज्यांनी राज्याला कर्जबाजारी करण्याचा पाच वर्षे उद्योग केला त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ, नये त्यांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही. आम्ही राज्याची आर्थिक...
Read More