रणजी स्पर्धेची गटवारी जाहीर! गतविजेते विदर्भ, मुंबई एकाच गटात – eNavakal
News क्रीडा विदेश

रणजी स्पर्धेची गटवारी जाहीर! गतविजेते विदर्भ, मुंबई एकाच गटात

मुंबई –आगामी 2018-19 च्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेची गटवारी आज जाहीर करण्यात आली असून, गतविजेता विदर्भ संघ आणि मुंबई संघ यांचा एकाच गटात समावेश करण्यात आला आहे. या दोन्ही संघांना ‘अ’ गटात स्थान देण्यात आले आहे. यंदाच्या या स्पर्धेत संघांची 4 गटांत विभागणी करण्यात आली आहे, एलिट ‘अ’ आणि ‘ब’ गटात प्रत्येकी 9 संघांना स्थान देण्यात आले आहे. तर ‘क’ गटात 10 संघ आहेत. बिहार आणि ईशान्येकडील राज्याकडील तयार करण्यात आलेल्या विशेष गटातदेखील 9 राज्यांनाच स्थान देण्यात आले आहे. ‘अ’ गटात गतविजेते विदर्भ, मुंबई, बडोदा, गुजरात, छत्तीसगड, कर्नाटक, महाराष्ट्र, रेल्वे आणि सौराष्ट्र या संघांचा समावेश आहे. त्यामुळे यंदाच्या या स्पर्धेत जेतेपदासाठी जोरदार चुरस बघायला मिळणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#AsiaCup2018 भारताने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय

दुबई – एशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील दुसर्‍या टप्प्याला आजपासून प्रारंभ होत असून, सुपर फोरमध्ये पुन्हा एकदा भारत, पाकिस्तान, बांगला देश आणि आफगाणिस्तान यांच्यात लढती...
Read More
post-image
महाराष्ट्र

दडी मारलेल्या पावसाची राजापूरमध्ये दमदार हजेरी

रत्नागिरी – गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारलेली आहे. काही तुरळक सरींचा अपवाद वगळता पावसाने तशी पाठच फिरवली होती. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. पण...
Read More
post-image
महाराष्ट्र

नदीतील तरंगता कचरा काढण्यासाठी ‘फ्लोटर वॉटर ड्रोन’चा वापर

पिंपरी – शहरातील पवना, इंद्रायणी व मुळा नदीपात्रातील तरंगता कचरा स्वच्छ करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने ‘फ्लाटिंग वॉटर ड्रोन’ची मदत घेतली आहे. गणेशोत्सवात प्रायोगित तत्त्वावर पवना...
Read More
post-image
मुंबई वाहतूक

मुंबईत रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर्सना नवे नियम लागू

मुंबई – मुंबईतील काही टॅॅक्सी ड्रायव्हर्सना आता परमिट दिले जाणार नाही. जे ड्रायव्हर्स कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात अडकेलेले आहेत किंवा ज्यांच्यावर सध्या कोर्टात केस सुरु...
Read More
post-image
महाराष्ट्र

साईनाथनगरमध्ये टोळक्याचा धुमाकूळ; धारदार हत्यारांनी गाड्यांची तोडफोड

पिंपरी – दिवसाढवळ्या 15 ते 18 जणांच्या टोळक्यांनी सशस्त्रांसह निगडी, साईनाथनगरमध्ये धुमाकूळ घातला. धारदार हत्यारांनी रस्त्यांवर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविली. दिवसाढवळ्या...
Read More