रंगकर्मी अरुण काकडेंचे मुंबईत दु:खद निधन – eNavakal
News महाराष्ट्र

रंगकर्मी अरुण काकडेंचे मुंबईत दु:खद निधन

मुंबई – 94 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष अरुण काकडे यांचे वयाच्या 87 व्या वर्षी मुंबईत दु:खद निधन झाले. भालबा केळकरांच्या पुण्यातील ‘प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन’, ‘रंगायण’ आणि ‘अविष्कार’ या प्रायोगिक रंगभूमीच्या जन्मदात्या संस्थाचे ते आधारस्तंभ होते.
प्रायोगिक रंगभूमी आणि समांतर नाट्य चळवळ या संकल्पना महाराष्ट्रात रुजविण्याचे काम पी.डी.ए. रंगायण आणि अविष्कार या नाट्य संस्थांनी केले. या तीनही संस्थांचे काकडे काका हे आधार होते. पु.ल. देशपांडे, गो.पु.देशपांडे, विजया मेहता, विजय तेंडुलकर, चिं.त्र्य. खानोलकर, अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे, जयदेव हट्टंगडी, रोहिणी हट्टंगडी, सदाशिव अमरापूरकर या लेखक, दिग्दर्शक व अभिनेत्यांच्या साथीने अरुण काकडे यांनी अजरामर प्रायोगिक नाटके दिली. शांतता कोर्ट चालू आहे, चिमणीचे घर मेणाचे, ससा आणि कासव, छोटे मासे मोठे मासे, पुढारी, तुघलक, तेथे पाहिजे जातीचे, पोस्टर या नाटकांनी सत्तर आणि ऐंशीच्या दशकात पुरोगामी पिढी घडविण्याचे काम केले. यामागे अरुण काकडे यांचे नाट्यप्रेम हेच कारण होते.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

कोल्हापुरात उड्डाण पुलाखाली स्फोट; एकाचा मृत्यू

कोल्हापूर – राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू असताना कोल्हापुरात शुक्रवारी भीषण स्फोट झाला. पुणे-कोल्हापूर महामार्गावरील उड्डाणपुलाखाली स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला. ही घटना शक्रवारी रात्री अकरा...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

नागपुरात रोड शो काढून मुख्यमंत्र्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

नागपूर – विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार सभा, फेऱ्या अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
देश

कमलेश तिवारी हत्येप्रकरणी बिजनोरमधून मौलानाला अटक

लखनऊ – हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी बिजनोरमधून मौलाना अनवारुल हकला ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे गुजरात एटीएसने या...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

‘चंपा’ कोणी तयार केला, हे निवडणुकीनंतर सांगेन – अजित पवार

पुणे – माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महसूलमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चंपा असे संबोधल्यानंतर राज्यभरात या नावाची चांगलीच चर्चा झाली. त्यानंतर...
Read More
post-image
मुंबई

रिलायन्स समूहाच्या नफ्यात १८ टक्क्यांची वाढ

मुंबई – देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत विक्रमी नफ्याची नोंद केली आहे. वार्षिक तुलनेत त्यांच्या नफ्यात १८.६...
Read More