रंकाळ्यात 100 वर्षांच्या मऊ पाठीच्या कासवाचा मृत्यू – eNavakal
News महाराष्ट्र

रंकाळ्यात 100 वर्षांच्या मऊ पाठीच्या कासवाचा मृत्यू

कोल्हापूर – कोल्हापुरातील प्रसिद्ध रंकाळा तलावात वास्तव्यास असलेल्या 100 वर्षे वयाच्या मऊ पाठीच्या कासवाचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. सुमारे 90 किलो वजनाच्या या कासवाचा रंकाळ्यातील प्रदूषणामुळे मृत्यू झाल्याचे पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे. काल दुपारी रंकाळा तलावात पद्माराजे उद्यानासमोर दोन तरुणांना एक कासव तरंगताना दिसले. या कासवाला रंकाळा बचाव समितीचे माहीर राजू राऊत, अमर जाधव, राजू पाटील यांनी पाण्यातून बाहेर काढले. या कासवाची लांबी साडेपाच फूट असून मृतावस्थेत त्याच्या अंगावर कोणतीही जखम दिसून आलेली नाही. त्यामुळे ते प्रदूषित पाण्यामुळे मृत झाले असावे, असे पर्यावरण तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या मऊ पाठीच्या कासवाला ‘इंडियन सॉफ्टशेड टरटल’ असे म्हटले जाते. हे कासव वाघाइतकेच संरक्षित आहे. या जातीची अनेक कासवे या तलावात असल्याची शक्यता आहे. त्यामुळे रंकाळा तलाव संरक्षित घोषित करावा, अशी मागणी पर्यावरण तज्ज्ञ प्रा. डॉ.जय सामंत यांनी केली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 भारताच्या 200 धावा पूर्ण

मँचेस्टर (लंडन) – भारताने 34.2 षटकांत आपल्या 200 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 113, कर्णधार विराट कोहली 24 धावांवर खेळत आहेत.  रोहित शर्माने विश्‍वचषक स्पर्धेतील...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती

आज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली  झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ

मुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...
Read More
post-image
विदेश

हाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित

हाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...
Read More
post-image
देश

…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट

नवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...
Read More