योगेश सोमण यांच्यावर मुंबई विद्यापीठाची कारवाई; धाडले सक्तीच्या रजेवर – eNavakal
मुंबई

योगेश सोमण यांच्यावर मुंबई विद्यापीठाची कारवाई; धाडले सक्तीच्या रजेवर

मुंबई – अभिनेते आणि मुंबई विद्यापीठातील अकॅडमी ऑफ थिएटर आर्टचे (एमटीए) संचालक योगेश सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. सोमण यांच्या भोंगळ कारभारामुळे एमटीएच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी आंदोलन पुकारले होते. याची दखल घेत विद्यापीठ प्रशासनाने सोमण यांना सक्तीच्या रजेवर धाडले आहे.

विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला आमदार कपिल पाटील यांनी पाठिंबा दिला होता. विद्यार्थी विद्यापीठाच्या आवारात बसले असता हे आंदोलन तीव्र झाले होते. याची दखल घेत मध्यरात्री विद्यापीठ कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांनी सोमण यांच्या सक्तीच्या राजेबाबतच्या निर्णयाचे पत्र कपिल पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांकडे सुपूर्द केले.

एमटीएच्या विभागात सोमण यांचा भोंगळ कारभार सुरू असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. एमटीएच्या एमएला २५ विद्यार्थ्यांचा नियम असताना ६० विद्यार्थ्यांना घेण्यात आले. तसेच डिप्लोमामध्येही ५० विद्यार्थ्यांना घेतले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला. यासह आपल्यावर विशिष्ट विचारधारा थोपवली जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. आम्हाला योग्य प्रकारे नाट्यशास्त्राचे शिक्षण दिले जात नाही, अशी तक्रार विद्यार्थ्यांची आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
मुंबई

मुंबईतील १५० तबलिगींवर पोलिसांत गुन्हे दाखल

मुंबई – नवी दिल्लीतील निजामुद्दीन भागात झालेल्या तब्लिगी जमातच्या मरकज कार्यक्रमात सहभागी झालेल्या मुंबईतील १५० जणांवर आझाद मैदान पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

आधी परदेश दौरे आणि जाहिराती बंद करा! सोनियांची मोदींना खरमरीत सूचना

नवी दिल्ली – कोरोनाच्या महामहारीशी लढण्यासाठी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सर्व खासदार आणि सर्व राज्यपालांच्या मानधनात तीस टक्के...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

‘मैत्री सुड उगवण्यासाठी नसते’; राहुल गांधींची ट्वीटवरून प्रतिक्रिया

नवी मुंबई – भारताने हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषधे अमेरिकेला द्यावीत, अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल, अशी धमकी अमेरिकेने दिली होती. या प्रकारानंतर आज काँग्रेस नेते राहुल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

उत्तराखंडमध्ये क्वारंटाईन असलेल्या वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

नैनिताल – उत्तराखंडातील रुद्रपुर येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवलेल्या एका वृद्धाने काल गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हा वृद्ध उत्तर प्रदेशातील पीलिभीत जिल्ह्यातील राहणारा आहे. या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

…म्हणून लॉकडाउन काही प्रमाणात शिथिल करावा – हसन मुश्रीफ

अहमदनगर – १४ एप्रिलनंतर अनेक लोक घरात राहण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे ज्या भागात कोरोनाचे रुग्ण नाहीत. अशा ठिकाणी लॉकडाउन काही प्रमाणात शिथिल करावा, असं...
Read More