येत्या २५ फेब्रुवारीला राज्यातील शाळा बंद – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

येत्या २५ फेब्रुवारीला राज्यातील शाळा बंद

मुंबई – दहावी-बारावीच्या परीक्षा सुरु असतानाच येत्या सोमवारी, 25 फेब्रुवारी रोजी राज्यभरातील शाळा बंद राहणार आहेत. शिक्षण क्षेत्रातील 14 संघटनांनी एकत्र येऊन राज्य सरकारचा निषेध म्हणून हे शाळाबंद आंदोलन छेडले आहे.

फेडरेशन ऑफ स्कुल असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे. 1 नोव्हेंबरचा शासन निर्णय तात्काळ मागे घेऊन 2012 ते 19 पर्यंत 25 टक्के प्रवेशाची थकीत फीचा परतावा मिळावा. सर्व शाळांसाठी ‘शाळा सुरक्षा कायदा’ सक्तीचा करण्यात यावा.

18 नोव्हेंबर 2013 च्या शासन आदेशामध्ये दुरुस्ती करण्यात यावी. शालेय विद्यार्थी वाहतुकीची जबाबदारी मुख्याध्यापकांऐवजी शाळेचे नियुक्त केलेल्या वाहतूक व्यवस्थापनावर द्यावी, स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर शाळांच्या दर्जा वाढ प्रस्तावासाठी ऑनलाईन प्रक्रिया तातडीने सुरु करण्यात यावी, या मागण्यांसाठी हे शाळाबंद आंदोलन करण्यात येणार आहे.

या संघटनांनी दिला शाळाबंदला पाठिंबा

स्कुलबस ओनर्स असोसिएशन, पीटीए युनायटेड फोरम, इंटरनॅशनल स्कूल असोसिएशन, नॅशनल इंडिपेंडेंट स्कुल अलायन्स, खासगी विनाअनुदानित शाळा व्यवस्थापन असोसिएशन, इंडिपेंडेंट इंग्लिश स्कुल असोसिएशन, महामुंबई शिक्षक संस्था संघटना, अनएडेड स्कुल फोरम, असोसिएशन ऑफ इंटनॅशनल स्कुल.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

पक्षांतरामुळे भविष्यात मोठा राजकीय भूकंप! शिवस्वराज्य यात्रेत अजित पवारांचे भाकित

यवतमाळ – राज्यात पक्षांतराची लाट आली आहे. अनेक जण आपला स्वार्थ, स्वत:च्या संस्था वाचविण्यासाठी, शासनाचे अनुदान घेण्यासाठी, सत्ताधार्‍यांकडून होणारी कारवाई टाळण्यासाठी पक्षांतर करत आहेत....
Read More
post-image
News महाराष्ट्र

जनशताब्दीला सावंतवाडीत थांबा

सावंतवाडी – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईहून गोव्याला जाणार्‍या जनशताब्दी एक्स्प्रेसला आता सावंतवाडी स्थानकात थांबा देण्याचा निर्णय रेल्वे मंडळाकडून...
Read More
post-image
News देश

‘पारले’ बिस्कीटला मंदीचा फटका! हजारो कर्मचार्‍यांवर बेकारीचे संकट

नवी दिल्ली – बिस्कीटांचे उत्पादन घेणार्‍या देशातील सर्वात मोठ्या पारले कंपनीलाही मंदीचा फटका बसला आहे. तसेच मागणी घटल्याने कंपनीने उत्पादनात कपात केली आहे. त्यामुळे...
Read More
post-image
News देश

प्रियांका चोप्राला यूएनच्या ‘सदिच्छा दूत’ पदावरून हटवा

नवी दिल्ली- पाकिस्तानी मंत्र्याने बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राला संयुक्त राष्ट्राच्या ‘सदिच्छा दूत’ पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानातील मानवी हक्क खात्याच्या मंत्री शिरीन मझारी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

चिदंबरम यांना दिलासा नाहीच! १६ तासांपासून फरार

नवी दिल्ली – आयएनएक्स मीडिया घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार आणि मनी लॉंडरिंग प्रकरणात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृह व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा...
Read More