येत्या निवडणुकीत खंडोबाराया भाजपाचा ‘खेळखंडोबा’ करणार – eNavakal
आघाडीच्या बातम्या राजकीय

येत्या निवडणुकीत खंडोबाराया भाजपाचा ‘खेळखंडोबा’ करणार

नांदेड – भाजपाने धनगर समाजाचा विश्वासघात केल्याने श्रीक्षेत्र माळेगाव येथील खंडोबाराया येणार्‍या निवडणुकीत भाजपाचा खेळखंडोबा केल्याशिवाय राहणार नाही, अशी ललकारी धनगर समाजाच्या ज्येष्ठ नेत्या तथा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी माळेगाव येथील धनगर आरक्षण महामेळाव्यात दिली. यावेळी त्यांनी पुढील वर्षी माळेगावात अहिल्यागड उभारणार असे जाहीर केले.

कार्यकमास आ. रामराव वडकुते, माजी आ.शंकरअण्णा धोंडगे, माजी आ. बाबासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिलीप धोंडगे, कार्याध्यक्ष दत्ता पवार , प्रांजली रावणगावकर, जि. प. सदस्य डॉ. विजय धोंडगे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. श्रीक्षेत्र माळेगाव येथील खंडोबारायाच्या यात्रेत भाजपाने धनगर आरक्षण जागर महामेळाव्याचे तर राष्ट्रवादी काँग्रेसने धनगर आरक्षण ललकार महामेळाव्याचे आयोजन केले होते.

भाजपाकडून राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. तर राष्ट्रवादीच्या वतीने खा. सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, यांना आमंत्रित करण्यात आले होते. परंतु, ऐनवेळी खा. सुप्रिया सुळे यांचा दौरा रद्द झाल्याने त्यांच्या ठिकाणी धनंजय मुंडे येणार असल्याचे घोषित केले होते. पंकजा मुंडे व आ. धनंजय मुंडे हे बहीण-भाऊ काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते; पण धनंजय मुंडेही काही कारणास्तव येऊ शकले नाही. त्यानंतर धनगर समाजाच्या आक्रमक नेत्या सक्षणा सलगर यांनी धनगर समाजाच्या आरक्षणावरून भाजपा सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

आतापर्यंत ९ लाख २६ हजार १४० क्विंटल अन्नधान्याचे वाटप

मुंबई – राज्यातील 52 हजार 427 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे 1 जुलै ते 11 जुलै पर्यंत राज्यातील 58 लाख 35...
Read More
post-image
आरोग्य कोरोना महाराष्ट्र मुंबई

कल्याण डोंबिवलीत सर्वाधिक ६६१ रुग्ण तर ८ जणांचा मृत्यू

कल्याण – कल्याण डोंबिवलीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येने ६०० चा आकडा ओलांडत १२ हजारांचा टप्पा गाठला आहे. आज कल्याण डोंबिवलीमध्ये सर्वाधिक ६६१ रुग्णांची...
Read More
post-image
आरोग्य कोरोना महाराष्ट्र मुंबई राजकीय

धारावी कोरोनामुक्तसाठी राजकीय श्रेयवाद, शिवसेना-भाजपमध्ये जुंपली

मुंबई – दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या धारावीत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. याची दखल खुद्द जागतिक आरोग्य संघटनेनेही घेतली. मात्र त्यामुळे राज्यात आता नवा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

घोडे तबेल्यातून फरार झाल्यावर जाग येणार का? सिब्बलांचा थेट सवाल

नवी दिल्ली – राजस्थानमधील उपमुख्यमंत्री सचिन पायलट भाजपच्या वाटेवर आहेत. शिवाय त्यांच्यासोबत काही आमदारही फुटण्याची शक्यता आहे. या मुद्द्यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल...
Read More
post-image
महाराष्ट्र

लॉकडाऊनआधीच पुण्यात नवनियुक्त आयुक्तांनी स्विकारला पदभार

पुणे – पुण्यात उद्या १३ जुलैपासून लॉकडाऊन जारी करण्यात येणार आहे. त्याआधीच पुण्यात नवनियुक्त महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पदभार स्विकारला आहे. वाचा – धारावी...
Read More