नागपूर – महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते सुधीर तांबे यांचे पुत्र आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांनी सर्वाधिक मते मिळवत विजय संपादन केला. काँग्रेसचे नेते सुभाष झनक यांचा मुलगा आ. अमित झनक यांनी दुसर्या क्रमांकाची मते मिळवली. तर तिसर्या क्रमांकाची मते कुणाल राऊत यांना मिळाली. आ. झनक व राऊत हे आता पक्षाचे उपाध्यक्ष झाले आहेत.
तांबे यांच्या निवडीनंतर त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. सत्यजित तांबे यांनी 70 हजार 189 मते मिळवली आणि आमदार सुभाष झनक 32 हजार 999 मते, तर कुणाल राऊत 7 हजार 744 मते मिळवून उपाध्यक्ष झाले. सत्यजित तांबे हे 37 हजार 190 मताधिक्याने निवडून आले. 60 युवकांची प्रदेश कार्यकारिणीदेखील या निवडणुकीच्या माध्यमातून तयार झाली आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दोन वेळा अहमदनगर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केले आहे. अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी 2014 ला काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. याअगोेदर दोन वेळा त्यांनी युवक काँग्रेसचे उपाध्यक्षपद भूषविले आहे. अभ्यासू, आक्रमक आणि तळागाळातील काँगे्रस कार्यकर्त्यांशी नाळ जोडलेला युवा नेता म्हणून त्यांची ओळख आहे.