‘या’ महाविद्यालयात विद्यार्थिनींना दिली चक्क ‘प्रेम न करण्याची’ शपथ – eNavakal
महाराष्ट्र

‘या’ महाविद्यालयात विद्यार्थिनींना दिली चक्क ‘प्रेम न करण्याची’ शपथ

अमरावती – व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील एका महाविद्यालयात विद्यार्थिनींना चक्क प्रेमात न पडण्याची शपथ देण्यात आली. चांदूर रेल्वे येथील विदर्भ युथ वेलफेयर सोसायटीद्वारा संचालित महिला व कला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना अशी शपथ देण्यात आली. यावेळी विद्यार्थिनींनी ‘मी अशी शपथ घेते की, माझा माझ्या आई-वडिलांवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे सभोवताली घडणाऱ्या घटना लक्षात घेता, मी प्रेम व प्रेमविवाह करणार नाही. त्याशिवाय मी माझे लग्न हुंडा घेणाऱ्या मुलाशी करणार नाही. सामाजिक परिस्थितीमुळे आज माझे लग्न माझ्या कुटुंबाने हुंडा देऊन केले, तर भावी पीढीतील एक माता म्हणून मी माझ्या होणाऱ्या सुनेकडून हुंडा घेणार नाही. तसंच मुलीसाठी हुंडा देणार नाही. समर्थ भारतासाठी, स्वस्थ समाजासाठी एक सामाजिक कर्तव्य म्हणून मी ही शपथ घेते’, अशी शपथ घेतली. 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन्स डे हा प्रेमाचा दिवस साजरा केला जात असताना, त्याच्या पूर्वसंध्येला मुलींनी प्रेमविवाह न करण्याची शपथ घेतली.

या महाविद्यालयात देण्यात आलेल्या शपथेत शिक्षकांनी सामाजिक कर्तव्य म्हणून विद्यार्थिनींमध्ये हुंडा देणाऱ्या मुलाशी लग्न करू नका किंवा भावी पीढीला हुंडा न घेण्याबाबत जागृत करा, अशा पद्धतीचं आवाहन केलं असलं तरी याच शपथेत चक्क प्रेम व प्रेमविवाह करू नये, असा सल्लाही देण्यात आला आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभागप्रमुख म्हणाले, ‘प्रेम करण्याला आपला विरोध नाही. प्रेम वाईट आहे, असंही आपण म्हणत नाही. पण कुमारवयात मुलींना प्रेम आणि आकर्षण यांच्यात फरक कळत नाही. त्यामुळे आपल्यासाठी योग्य व्यक्ती कोण याची त्यांना जाणीव नसते, त्यामुळे याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ही शपथ देण्यात आली.’

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

बाबरी मशिदीसाठी मिळाली ‘ही’ जागा

अयोध्या- अयोध्येपासून ३० किमी दूर असलेल्या धन्निपूर येथे बाबरी मशिद बांधण्यास पाच एकर जमीन सुन्न वक्फ बोर्डाला देण्यात आली आहे. ही जागा स्विकारण्याचा निर्णय...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

मुख्यमंत्र्यांचीही निवड थेट जनतेतून व्हावी- अण्णा हजारे

अहमदनगर – फक्त गावचे सरपंच नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्र्यांचीही निवड थेट जनतेतून व्हावी असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे. सरपंच...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

#TrumpInIndia ताजने आम्हाला प्रेरित आणि चकीत केलं- डोनाल्ड ट्रम्प

नवी दिल्ली – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प, कन्या इव्हान्का ट्रम्प आणि जावई जॅरेड कुशनर यांच्यासह आज पहिल्यावहिल्या भारत भेटीवर...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

माळेगावचा पहिला निकाल, अजित पवारांच्या पॅनलला यश

बारामती -अतितटीच्या ठरलेल्या माळेगाव कारखानच्या निवडणुकीत ब वर्ग मतदारसंघात राष्ट्रवादीच्या स्वप्नील जगताप यांनी विजय मिळवला आहे. अन्य २० जागासाठी मतमोजणी सुरू आहे. माळेगाव कारखान्याच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

जयसिद्धेश्वर महाराजांची खासदारकी धोक्यात

सोलापूर – सोलापूरचे भाजप खासदार जयसिद्धेश्वर महाराजांच्या जातीचा दाखला रद्द करण्यात आला आहे. जात पडताळणी समितीने हा दाखला बनावट असल्याचे सांगत रद्द केला. त्यामुळे...
Read More