या गुणवत्तेची इयत्ता कोणती? – eNavakal
संपादकीय

या गुणवत्तेची इयत्ता कोणती?

संपूर्ण देशातील शिक्षणाचा स्तर समाधानकारक नसल्याच्या तक्रारी येत असताना केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने देशातील शिक्षण संस्थांची गुणवत्तेतील क्रमवारी जाहीर करण्याचे धाडस दाखवावे, हेदेखील विशेष ठरते. ही गुणवत्ता ठरवत असताना कोणते निकष वापरले जातात, याचा खुलासा जरी झालेला नसला, तरी त्या त्या संस्थेतील पायाभूत सुविधा, येथील शिक्षकवर्ग वातावरण, विद्यार्थ्यांना दिल्या जात असलेल्या सोयी सुविधा याचा विचार केला जात असावा. परंतु देशातील एकूण शिक्षण संस्थांची संख्या आणि त्याचा विद्यार्थ्यांना होणारा नेमका लाभ याचे गुणोत्तर मांडले, तर फारसे समाधान पदरी पडत नाही. मग देशातील इंजिनीअरिंग कॉलेजची वाढलेली संख्या, मेडिकल कॉलेजमध्ये चालणारे गैरप्रकार, प्रचंड डोनेशन देऊन घ्यावा लागणारा प्रवेश, भरमसाठ फी देऊनही मनासारखे न मिळणारे शिक्षण अशा अनेक प्रकारच्या तक्रारी किंवा निराशाजनक परिस्थिती असताना केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने स्वतःचे आणि इतरांचे सांत्वन केलेले दिसून येते. ही क्रमवारी ठरवताना शैक्षणिक संस्थांनी आपला दर्जा वाढवावा, आपापसातील गुणवत्तेसाठी स्पर्धा करावी, असा हेतू असल्याचे मनुष्यबळ मंत्रालयाने म्हटले होते. परंतु गुणवत्तेचीच वानवा असल्यामुळे स्पर्धा नेमकी कोणत्या संदर्भात करायची, असा प्रश्न निर्माण होतो. पायाभूत किंवा मूलभूत सुविधा किंवा त्या त्या शिक्षण संस्थांमधील उत्तम प्रशासन या दोनच मुद्द्यांवर गुणवत्तेचा विचार झालेला दिसतो. अभ्यासक्रम, ते शिकवण्याची कार्यपध्दती, विद्यार्थ्यांचे समाधान, संबंधित शिक्षण संस्थांतील शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना झालेला लाभ याची तपासणी केली तर हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच संस्था सापडू शकतील. म्हणून या क्रमवारीत कोणत्या विद्यापीठाचा किंवा कॉलेजचा क्रमांक लागला, याला फारसे महत्त्व राहात नाही. त्यातल्या त्यात बंगलोर इथली इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही संस्था अव्वल क्रमांकावर राहिली. मुंबईच्या आयआयटीने तिसरा क्रमांक पटकवला. भारतीय विद्यापीठ किंवा नरसिंह मोनजी यासारख्या खाजगी विद्यापीठांनाही चांगली क्रमवारी मिळू शकते. याचेही विद्यार्थ्यांना पालकांना आश्चर्य वाटू शकते. तर ग्रामीण भारतात एकही गुणवत्ताप्राप्त संस्था नाही, हेही या क्रमवारीने दाखवून दिले आहे. म्हणजे इंडिया आणि भारत असेदेखील गुणवत्तापूर्ण विभाजन केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने केल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
सांत्वनाचीही शोकांतिका
शैक्षणिक संस्थांची ही गुणवत्ता क्रमवारी ठरवण्याचे काम सरकार नियुक्त समिती करते. ती जेव्हा त्या त्या संस्थांच्या संस्थांच्या पदाधिकार्‍यांशी, प्राचार्यांशी आणि अतिशय कमी प्रमाणात विद्यार्थ्यांशी संवाद साधते, तेव्हा आपल्या संस्थेने काय सोयी सुविधा दिल्या आहेत, हे पटवून देण्याचे काम संस्थाचालक अनेक प्रकारच्या युक्त्या वापरून करीत असतात. खरे तर त्या त्या संस्थेतील विद्यार्थ्यांकडून जर गोपनीय पध्दतीने त्यांची मते जाणून घेतली, तर फार वेगळा निष्कर्ष बाहेर निघू शकतो. कारण शिक्षण संस्थांमधला मुख्य लाभार्थी विद्यार्थी असतो. त्याचे त्या शिक्षण संस्थेविषयी शिक्षण, सोयी सुविधांविषयी, प्राध्यापकांविषयी काय मत आहे जाणून घेणे जास्त महत्त्वाचे ठरते. सोयी सुविधांबरोबरच उत्तम पध्दतीचा अध्यापकवर्ग तितकाच गरजेचा असतो. म्हणून ही क्रमवारी तपासणार्‍या समितीने विद्यार्थ्यांशी अधिक संवाद साधला पाहिजे. विद्यार्थी संवादाशिवाय तयार होणारी ही गुणवत्ता क्रमवारी कुचकामी स्वरूपाची ठरते. या संदर्भात विद्यार्थी संघटनांनी खरे तर आग्रह धरायला हवा. आज जवळपास सत्तर टक्के शिक्षण संस्थांविषयी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये नाराजी असते. कारण प्रचंड शुल्क भरूनही त्यांच्या मनासारखे शिक्षण त्यांना मिळत नाही. इंजिनीअरिंग कॉलेजची अवस्था तर अतिशय भयंकर आहे. दीड दीड, दोन दोन लाख फी घेऊन विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिकवले जात नाही. प्रॅक्टिकल्स होत नाहीत. प्राध्यापक, प्रोजेक्टस तयार करून घेत नाहीत. उलट खाजगी क्लासेसवरच या विद्यार्थ्यांना अवलंबून राहावे लागते. अगदी स्वतःला स्वायत्त विद्यापीठ म्हणवणार्‍या संस्थांमध्ये तर यापेक्षाही मोठा सावळागोंधळ चालतो. अशा परिस्थितीत देशातील शिक्षण संस्थांमध्ये स्पर्धा निर्माण व्हावी, त्यांनी दर्जा वाढवावा. यासाठी ही क्रमवारी असल्याचे सांगितले जात असेल तर सांत्वनाचीसुध्दा अशी भीषण शोकांतिका असू शकते, हे नव्यानेच लोकांसमोर येईल.
या गुणवत्तेची इयत्ता कोणती?
विद्यार्थी कोणत्या परिस्थितीत आणि काय कष्ट घेऊन शिक्षण घेतो, हे त्याचे त्याला माहीत असते. अनेक अडचणी सहन करीत आपल्या आईवडिलांनी भरलेल्या प्रचंड शुल्काची परतफेड करायची आहे, म्हणून तो स्पर्धेत उतरतो. परंतु शिकवण्याच्या बाबतीतच उदासीनता असल्याने अनेक वेळेला त्याच्या पदरी नैराश्य येते. ही परिस्थिती अगदी आयआयटीमध्येसुध्दा आहे. आजची देशातील एकूण बेरोजगारीची परिस्थिती पाहिली तर या संस्थांच्या तथाकथित गुणवत्तेची सहज कल्पना येते. त्या त्या शिक्षण संस्थांमधून किती टक्के विद्यार्थी उत्तम करियर घडवू शकले, उत्तम नोकरी किंवा व्यवसाय करू शकले. याचादेखील वेध घेतला गेला पाहिजे. देशातील बेरोजगारीचे प्रमाण वाढत असताना शिक्षण संस्थांच्या गुणवत्तेच्या क्रमवारीचे ढोल किती बेगडी आहे, हे वेगळे सांगायची गरज उरत नाही. जागतिक स्तरावरच्या विद्यापीठांच्या स्पर्धेत भारताचे एकही विद्यापीठ आपले अस्तित्व दाखवू शकत नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेतली, तर खर्‍या गुणवत्तेपासून आपण किती मैल दूर आहोत, हे सहजपणे लक्षात येईल अशा शिक्षण संस्थांमधून विद्यार्थी कसा घडवला जातो आणि तो किती समाधानी आहे, याला प्राधान्य दिले पाहिजे. दुर्दैवाने शिक्षण संस्थेचा मालक कोण, त्याचा पसारा किती मोठा, तिथल्या विद्यार्थ्यांची संख्या किती या गोष्टींनाही महत्त्व दिले जाते. यापेक्षा अगदी छोट्या स्वरूपातल्या, परंतु मोठ्या उद्दिष्टांची सहज पूर्तता करणार्‍या शिक्षण संस्थादेखील मोलाचे काम करतात. म्हणूनच शिक्षण संस्थांच्या या गुणवत्तेची इयत्ता नेमकी कोणती, हे तपासले गेले पाहिजे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
ट्रेंडिंग

क्वारंटाईनमध्ये काय खावं आणि काय टाळावं? ‘WHO’ ने दिल्या ‘या’ सूचना! 

लॉकडाउनच्या काळात प्रत्येकजण घरी राहून आपापल्या आरोग्याची काळजी घेत आहेत. सध्या कोरोना या महामारीपासून बचाव करण्यासाठी लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. पोषक आहार, व्यायाम आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

इस्राईलचे आरोग्य मंत्री व त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण

जेरुसलेम – कोरोनाची लागण झालेल्या बड्या लोकांच्या यादीत आता इस्राईलचे आरोग्य मंत्री यांचं देखील नाव सामील झालं आहे. इस्राईलचे आरोग्यमंत्री याकोव्ह लिट्झमॅन आणि त्यांच्या...
Read More
post-image
ट्रेंडिंग

घरात चिडचिड होऊ नये, यासाठी काय करावं?

जगावर कोरोनाचे संकट असल्याने आणि देशात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे आपल्याला मनसोक्त घराबाहेर पडत येत नाही. अर्थात हे आपल्या काळजीसाठीच असलं तरी घरात राहून कंटाळा...
Read More
post-image
ट्रेंडिंग

आश्चर्यम! लॉकडाउन असूनही ४२.२ किमीची मॅरेथॉन केली पूर्ण

लॉकडाउन संपून कधी एकदाचं घराबाहेर हिंडायला जातो, असं सध्या प्रत्येकाच्याच मनात येत असणार. पण काय आहे कि, लॉकडाउन असल्याने त्याचे नियम तर पाळावेच लागणार....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबईकरांनो काळजी घ्या! एका दिवसांत वाढले ५७ रुग्ण

मुंबई -राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढते आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ८१ रुग्ण नव्याने दाखल झाले आहेत. त्यापैकी ५७ रुग्ण एकट्या मुंबईत सापडले आहेत....
Read More