मुंबई – देशभरात माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे, असे असतानाच भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याने इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेदरम्यान स्वतचे काढलेले फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहे. यामुळे तो सध्या सोशल मिडीयावर चांगलाच ट्रोल होताना दिसत आहे.
भारत आणि इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या या कसोटी मालिकेत इंग्लंडने २-0 ने आघाडी मिळवली आहे. यामुळे भारताची परिस्थिती गंभीर असून या मालिकेत भारतीय संघातले क्रिकेटपटू चांगली कामगिरी बजावू शकलेले नाही. दरम्यान अष्टपैलू अशी ओळख असलेल्या हार्दिक पांड्यालाही चांगली कामगिरी पार पाडता आली नाही. तसेच काल माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने देश शोकसागरात बुडालेला असताना हार्दिक पांड्याने इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याचे इंग्लडमध्ये प्रवासादरम्यान काढलेले फोटो शेअर केले आहे. या फोटोत हार्दिकने चष्मा आणि टोपी घातली आहे. या फोटोवरून सध्या तो ट्रोल होताना दिसत आहे. यावर एका युजरने म्हंटल आहे की, भाई गेम प्र फोकस कर ले. तर दुसरा युजर म्हणाला की, क्रिकेट प्र ध्यान दो वरना टीम से बाहर हो जावोगे. तर काहींनी त्याला शॉपिंगपेक्षा मैदानावर अधिक वेळ घालवं, असा सल्ला दिला आहे.