यजमान इंग्लंडने कसोटी मालिका जिंकली – eNavakal
News क्रीडा विदेश

यजमान इंग्लंडने कसोटी मालिका जिंकली

लंडन – यजमान इंग्लंड क्रिकेट संघाने आज येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात चौथ्याच दिवशी टीम इंडियाचा 60 धावांनी पराभव करून मालिका विजयावरदेखील शिक्कामोर्तब केले. पाच सामन्यांच्या या मालिकेत इंग्लंडने आता 3-1 अशी विजयी आघाडी घेतली आहे. विजयासाठी टीम इंडियासमोर 245 धावांचे लक्ष्य होते. पण टीम इंडियाचा दुसरा डाव चहापानानंतर 69.4 षटकांत 184 धावांतच आटोपला.

त्या अगदोर इंग्लंडचा दुसरा डाव आज फार काळ चालला नाही. राहिलेले दोन फलंदाज झटपट बाद झाले. 271 धावांत त्यांना गुंडाळण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले नाही. भारतातर्फे शमीने 4 आणि इशांत शर्माने 3 बळी घेतले.
विजयासाठी 245 धावांचे आव्हान घेऊन उतरणार्‍या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर राहुलला रॉडने भोपळादेखील फोडू दिला नाही. त्यानंतर पहिल्या डावातील शतकवीर पुजाराला अँडसरनने 5 धावांवर पायचित करून भारताला मोठा धक्का दिला. मग धवनला देखील अँडरसननेच 17 धावांवर बाद करून भारताची अवस्था 3 बाद 22 धावा अशी बिकट केली. त्यानंतर कर्णधार कोहली आणि रहाणेने चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून भारताचा डाव सावरला. ही जोडी जमणार असे वाटत असताना चहापानाला थोडावेळ बाकी असताना मोईन अलीने विराटला 58 धावांवर बाद करून भारताला मोठा धक्का दिला. त्याने 130 चेंडू खेळताना चार चौकार मारले. विराट बाद झाल्यानंतर पुन्हा भारताची घसरगुंडी उडाली. पांड्याला भोपळादेखील फोडता आला नाही. तर यष्टीरक्षक पंतला 18 धावांवर मोईन अलीनेच बाद केले. मग जम बसलेल्या रहाणेला मोईन अलीनेच बाद करून इंग्लंडचा विजय निश्चित केला. विराट आणि रहाणे या दोघांचा अपवाद वगळता इतर भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली. पहिल्या डावात 5 बळी घेणार्‍या मोईन अलीने दुसर्‍या डावातदेखील 4 बळी घेऊन त्यांच्या विजयात मोठी भूमिका बजावली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

शिवस्मारकाचं काम २४ ऑक्टोबर सुरु होणार 

मुंबई – अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्यात येणार असून त्याचे काम २४ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. एल अँँड टी कंपनीला स्मारक उभारण्याचे कंत्राट देण्यात आले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

#MeToo चेतन भगत म्हणतो ‘मीच पीडित’

मुंबई – #MeToo मोहिमेचे वारे सध्या सर्वत्र वाहत आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध लेखक चेतन भगतवर एका महिलेने अश्लील संभाषण केल्याचा आरोप केला होता. परंतु...
Read More
post-image
न्युज बुलेटिन व्हिडीओ

नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१५-१०-२०१८)

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२०-०५-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन (०१-०६-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

कल्याण – डोंबिवलीकरांना उद्या पिण्याचे पाणी नाही

कल्याण – यंदाच्या कमी झालेल्या पावसाचे सावट राज्यात हिवाळ्यापासून  भासु लागले आहे. त्याचाच फटका ठाणे जिल्हवासियांसोबतच कल्याण, डोंबिवली येथे राहणाऱ्या जनतेलासुद्धा बसला आहे. ठाणे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

जलयुक्त ‘शिव्या’र , राज ठाकरेंची व्यंगचित्रातून सरकारवर टीका

मुंबई – फडणवीस सरकारने तथ्य व नियोजन नसलेल्या पण अती गाजावाजा केलेल्या जलयुक्त शिवार व शेतक-यासाठी विहिरी सारख्या योजनांनी महाराष्ट्राला दिलासा देण्याऐवजी अस्वस्थच केल आहे....
Read More