यंदा सरासरीपेक्षा ९६ टक्के पाऊस – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश हवामान

यंदा सरासरीपेक्षा ९६ टक्के पाऊस

नवी दिल्ली – भारतीय हवामान विभागाने आज सोमवारी हवामान अंदाज जाहीर केला आहे. यंदा सरासरीप्रमाणे ९६ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. आज दिल्लीमध्ये यंदाच्या हवामानाविषयी पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये भारतीय हवामान खात्याने यंदाच्या पावसाचा अंदाज वर्तवला. यावर्षी अल निनोचा प्रभाव असला तरी तो क्षीण होईल असे भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. काही दिवसांआधी स्कायमेटने यंदा सरासरी इतका पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला होता. दुष्काळाची एक टक्काही शक्यता नसल्याचे त्यांनी सांगीतले होते. यानंतर आज भारतीय हवामान खात्याने अंदाज वर्तवल्यानंतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसावर देशाची अर्थव्यवस्था ब-याचप्रमाणात अवलंबून असल्याने शेतकरी, सरकार, उद्योजक या सर्वांचीच समाधानकारक पाऊस व्हावा अशी इच्छा आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
मनोरंजन

ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नाच्या वाढदिवसाचे ‘हे’ फोटो पाहिलेत?

माले – अभिषेक-ऐश्वर्या या बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध जोडीच्या लग्नाला शनिवारी तब्बल १२ वर्ष पूर्ण झाली. आपल्या लग्नाचा १२ वा वाढदिवस या दोघांनी मालदीवमध्ये साजरा केला....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या निवडणूक महाराष्ट्र

तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस

मुंबई – लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. या टप्प्यात २३ एप्रिलला राज्यातल्या १४ मतदारसंघांत मतदान होणार आहे. यामध्ये जळगाव, रावेर,...
Read More
post-image
अपघात आघाडीच्या बातम्या देश

आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ७ ठार ३४ जखमी

मैनपुरी – उत्तर प्रदेशमध्ये आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर ट्रक आणि बसच्या भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ३४ जण गंभीर जखमी झाले आहेत....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#IPL2019 दिल्लीचा पंजाबवर सहज विजय

नवी दिल्ली – आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेतील शनिवारच्या दुसर्‍या लढतीत दिल्लीने पंजाबवर सहज विजय मिळवला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करणार्‍या पंजाबला १६३ धावांत रोखण्यात यश...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगा ब्लॉक

मुंबई – मध्य, पश्‍चिम, हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून, पश्‍चिम मार्गावरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान डाऊन जलद लाईनवर आज सकाळी 10.35...
Read More