यंदाच्या वर्षापासून वैद्यकीय प्रवेशात आरक्षण लागू – हायकोर्ट – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

यंदाच्या वर्षापासून वैद्यकीय प्रवेशात आरक्षण लागू – हायकोर्ट

नवी दिल्ली – यंदाच्या वर्षापासून वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू होणार, असा निर्णय आज मुंबई हायकोर्टाने दिला आहे. त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा केला असला तरी तो यंदाच्या वैद्यकीय प्रवेशांत लागू करता येणार नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मे महिन्यात दिल्यानंतर राज्य सरकारने जूनमध्ये कायदादुरुस्ती करून घेत ते आरक्षण पुन्हा लागू केले. मात्र, या कायदादुरुस्तीला एमबीबीएस प्रवेशेच्छुक विद्यार्थ्यांच्या गटाने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यांची याचिका आज मुंबई हायकोर्टाने फेटाळली आणि यंदाच्या वर्षापासून वैद्यकीय प्रवेशात आरक्षण लागू होणार, असा निर्णय दिला आहे.

केया मोरबिया व अन्य काही विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अॅड. किरण हुबळीकर यांच्यामार्फत ही याचिका दाखल करण्यात आली होती. शासकीय नोकऱ्या व शिक्षण संस्थांमध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने दिलेले आरक्षण, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी (एसईबीसी) कायदा, २०१८ या कायद्यातील कलम १६(२)मध्ये नंतर करण्यात आलेली दुरुस्ती ही आमच्यासारख्या विद्यार्थ्यांच्या हक्कांवर गदा आणणारी आहे, असा आक्षेप याचिकादारांनी घेतला होता.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव प्रकरणाचा आज निर्णय

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयात आज 17 जुलै रोजी दुपारी 3 वाजता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

डोंगरीत ४ मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू

मुंबई – आज सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास डोंगरी परिसरात एक निवासी इमारत कोसळली आणि अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दडपून तिघांचा मृत्यू...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

रावसाहेब दानवेंचा राजीनामा! चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबई – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या राजीनाम्यानंतर काही वेळातच चंद्रकांत पाटील यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा उद्यापासून सुरू

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी व बारावीच्या फेरपरीक्षा उद्या बुधवारपासून सुरू होणार आहेत. पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यात दहावीच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

औरंगाबादच्या विधी विद्यापीठासाठी कांचनवाडीतील वाल्मीची जमीन

मुंबई – औरंगाबादच्या राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी कांचनवाडी येथील वाल्मीची 33 एकर जमीन देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आज पार...
Read More