म्हाडाच्या घरांच्या किंमतीत घट – उदय सामंत – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई

म्हाडाच्या घरांच्या किंमतीत घट – उदय सामंत

मुंबई – आता दिवाळीच्या आगोदरच म्हाडा घर विक्रेत्यांना बोनस मिळणार आहे. त्यामुळे मुंबईत घर घेणाऱ्या कुटूंबाचं स्वप्न आता पुर्ण होणार आहे. ज्या घरांची विक्री झाली नाही आहे, त्या घरांची किंमत कमी करुन पुन्हा विक्रितसाठी काढली जाणार आहेत. हि विक्री तीन टप्पांत होणार आहे. अशी माहिती म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली आहे.

येत्या दोन ते तीन दिवसांत बिल्डरकडून आलेल्या किंमती कमी करून आम्ही सामान्यांना घरं उपलब्ध करून देणार आहोत. त्यानंतर ती घरं नागरिकांसाठी खुली करण्यात येतील, असंही उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.

दिवाळीच्या आगोदर १ हजार १९४ घरांची लॉटरी निघणार आहे. तर वडाळ्यातील अ‍ॅन्टॉप हिल येथ अत्यल्प उत्पन्न गटासाठी २७८ घरे उपलब्ध आहे. या घराची किंमत ३० लाख ७५ हजारांच्या आसपास असेल. सायनजवळील प्रतीक्षानगर येथे ८३ घरे उपलब्ध असतील ज्यांची किंमत २८ लाख ७५ हजारांपर्यंत असेल. तर अत्यल्प गटासाठी ५ घरे असतील, ज्यांची किंमत १६ लाख ५० हजारांपर्यंत असेल. मानखुर्दजवळील अत्यल्प गटासाठी ११४ घरे असतील, ज्यांची किंमत २७ लाख २५ हजारांपर्यंत असेल. मुलुंडमध्येही अत्यल्प गटासाठी काही घरे उपलब्ध आहेत,ज्यांची किंमत ३० लाखांपर्यंत असेल. गोरेगावमध्ये अल्प उत्पन्न गटासाठी २४ घरे आहेत, ज्यांची किंमत ३१ लाख ७५ हजारांपर्यंत असेल.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

वसईत बीएसएनएलची इंटरनेट सेवा ठप्प

वसई – बीएसएनएलच्या इंटरनेटचे सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्यामुळे वसईतील दस्त नोंदणी रखडत चालली असून त्याचा फटका मात्र दररोज नोंदणी कार्यालये व त्याच्या लाखो...
Read More
post-image
News मुंबई

पालिकेचा केंद्र शासनाच्या ‘डिजिटल इंडिया’ पुरस्काराने सन्मान

मुंबई – पालिकेद्वारे नागरिकांना देण्यात येणार्‍या विविध सेवा सुविधा नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने सहजपणे उपलब्ध व्हाव्यात, विविध परवानग्या, दाखले, अनुज्ञप्ती पत्रे यासारख्या सेवा सुविधा माहिती...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पालिकेच्या रुग्णालयातील एक्स-रे मशीन कोमात

वसई- वसई-विरार महापालिकेच्या नालासोपार्‍यातील रुग्णालयाची एक्स-रे मशीन महिनाभरापासून नादुरुस्त असून आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे गोरगरीब रुग्णांना हजारो रुपयांचा भुर्दंड हकनाक सोसावा लागत आहे. नालासोपारा पुर्वेकडील...
Read More
post-image
News विदेश

‘जैश’चे मुख्यालय पाकिस्तानने घेतले ताब्यात

इस्लामाबाद – भारताच्या कारवाईच्या भीतीने पाकिस्तानने जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय ताब्यात घेतले आहे. मौलाना मसूद अजहरच्या जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय बहावलपूरमध्ये आहे. पंजाब सरकारने हे मुख्यालय ताब्यात घेतल्याची...
Read More
post-image
News महाराष्ट्र

प्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालयात

महाड- शिवप्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांना रक्तदाब कमी झाल्याचा त्रास झाल्याने महाड येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. आज सायंकाळच्या सुमारास...
Read More