…म्हणून मिलिंद सोमणने पुन्हा लग्न केलं – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश फोटो मनोरंजन

…म्हणून मिलिंद सोमणने पुन्हा लग्न केलं

मुंबई -प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण त्याची प्रेयसी अंकिता कोंवर या दोघांनीही ब्रेकअपची ही बातमी खोटी ठरवत, काही महिन्यापूर्वी लग्न केले. दोघांनीही आपले प्रेम कधीच लपवून ठेवले नाही. 22 एप्रिलला अलिबाग येथे हा विवाह सोहळा पार पडला. मात्र, मिलिंद-अंकिताने निसर्गसौंदर्याने नटलेल्या स्पेनमध्ये दुसऱ्यांदा लग्न केले आणि चर्चांना उधाण आले.

काही दिवसांपूर्वी मिलिंद आणि अंकिता सोशल मीडियावर चर्चेत होते ते म्हणजे एका ब्रॅंडच्या फोटोशूटमुळे. आता पुन्हा एकदा या जोडीचे फोटो चर्चेचा विषय ठरत आहेत. कारण हे फोटो आहेत त्यांच्या दुसऱ्यांदा पार पडलेल्या ‘बेअरफूट लग्नाचे’. या बेअरफूट लग्ना’चे फोटो अंकिताने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पण या दोघांनी पुन्हा का लग्न केले असावे हाच सर्वाना प्रश्न पडलाय…अखेर याचा कारण आता सर्वांसमोर आलाय. त्याचं झालं अस की, अंकिताला तिचं लग्न जंगलात, खळखळत्या धबधब्याच्या आणि निसर्गाच्या साक्षीने लग्न व्हावं अशी इच्छा होती. त्यामुळे अंकिताची ही ‘बकेट लिस्ट’ पूर्ण करण्यासाठी दोघांनी लगेच स्पेन गाठलं आणि पुन्हा लग्न केलं. मिलिंद सोमणने स्वत: सोशल मीडियावर या सुरेख सोहळ्याचा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्येच याविषयीची माहिती दिली.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

#MeToo भूषण कुमारांविरुद्ध लैंगिक शोषणाची तक्रार दाखल

मुंबई – ‘मीटू’ मोहिमेअंतर्गत देशात अनेक प्रतिष्ठित व्यक्तींची नावे समोर आली. यात टी-सीरीजचे मालक भूषण कुमार यांचाही समावेश आहे. त्यांच्याविरोधात आता मुंबईच्या ओशिवारा पोलीस...
Read More
post-image
महाराष्ट्र

मीरारोड येथे ३ सफाई कामगारांचा गुदमरून मृत्यू

मीरारोड – मीरा-भाईंदर महापालिकेच्या मलनि:सारण व शुद्धीकरण केंद्रातील सेप्टिक टँकची सफाई करत असताना मीरारोड येथील तीन मजुरांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली. मुजफ्फर मोहलिक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

जेट एअरवेज बचावाची आशा, मात्र एतिहादच्या कठोर अटी

मुंबई – आर्थिक अडचणींमुळे डबघाईला येऊन बंद पडण्याच्या वाटेवर असलेल्या जेट एअरवेजला एतिहाद एअरलाईनच्या नव्या प्रस्तावामुळे जिवंत राहण्याची आशा निर्माण झाली आहे. एतिहाद एअरलाईन ही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश न्यायालय

राज्यात डान्सबार पुन्हा सुरू होणार

मुंबई – राज्यभरात डान्सबार पुन्हा सुरू करावे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने साडेपाच तास डान्सबार सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. तसेच डान्सबारमध्ये...
Read More
post-image
गुन्हे देश

नवापूरच्या अल्पवयीन मुलीवर गुजरातमध्ये अत्याचार

नंदुरबार – नवापूर येथील अल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. या तीन आरोपींवर नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित...
Read More