…म्हणून टोयोटाने इनोव्हा, क्रिस्टा परत मागवल्या – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

…म्हणून टोयोटाने इनोव्हा, क्रिस्टा परत मागवल्या

नवी दिल्ली – टोयोटाने इनोव्हा क्रिस्टा आणि फॉर्च्यूनर या २६२८ गाड्या परत मागविल्या आहेत. कंपनीने गाड्यांमध्ये काही तांत्रिक बिघाड आढल्यामुळे या गाड्या परत मागविल्या असल्याचे सांगितले आहे. या २६२८ गाड्यांची पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे. यात काही बिघाड आढळल्यास त्यात सुधारणा करून गाड्यांना बदली करण्यात येणार आहे. कोणताही तांत्रिक बिघाड दुरूस्त करण्यासाठी टोयोटा ग्राहकांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारणार नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

१८ जुलै २०१६ ते २२ मार्च २०१८ दरम्यान उत्पादित झालेल्या इनोव्हा क्रिस्टा आणि फॉर्च्यूनर परत मागविण्यात आल्या आहेत. या गाड्यांमधील फ्यूल होज राऊटिंगची तपासणी करण्यात येणार आहे. यात काही बिघाड आढळल्यास त्याची दुरूस्ती करण्यात येणार आहे. याआधी देखील सुरक्षेच्या दृष्टीने वायर हार्नेस दुरूस्तीसाठी या गाड्या परत मागविण्यात आल्या होत्या.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

विदर्भात पावसाची हजेरी! वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस

नागपूर- मागील 24 तासांमध्ये विदर्भात पावसाने चांगलीच हजेरी लावली असून गेल्या 24 तासात वर्धा जिल्ह्यात 116 मिलीमीटर एवढा सर्वाधिक पाऊस झाला असल्याचे हवामान विभागाकडून...
Read More
post-image
News विदेश

आज भारत-पाकिस्तान पुन्हा मुकाबला

दुबई- एशिया चषक क्रिकेट  स्पर्धेत उद्या भारत-पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये पुन्हा एकदा मुकाबला रंगणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात गटातील सामन्यात हे दोन संघ बर्‍याच...
Read More
post-image
News मुंबई

गांधी जयंतीला ’सेवाग्राम’मध्ये काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी

मुंबई- महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त वर्धा येथील सेवाग्राम येथे काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीची बैठक येत्या 2 ऑक्टोबरला आयोजित करण्यात आली आहे. आगामी काळात...
Read More
post-image
News मुंबई

मुंबईच्या सुनियोजित विकासाला चालना मिळणार

मुंबई- मुंबईचे नागरी पुनर्निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा सुधारित विकास आराखडा-2034 सह विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2034 हे शासनाच्या मंजुरीने 01...
Read More
post-image
क्रीडा विदेश

पाकिस्तानने अफगाणिस्तानची विजयी दौड रोखली

अबुधाबी – एशिया चषक क्रिकेट स्पर्धेत सलग दोन सामने जिंकणार्‍या अफगाणिस्तान संघाची विजयी दौड अखेर पाकिस्तानने सुपर-4 मधील पहिल्या लढतीत रोखली. अगोदर गटातील दोन्ही...
Read More