…म्हणून अमिताभ बच्चन वाढदिवस साजरा करणार नाही – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

…म्हणून अमिताभ बच्चन वाढदिवस साजरा करणार नाही

मुंबई – आज महानायक अमिताभ बच्चन यांचा ७६ वा वाढदिवस. दरवर्षीप्रमाणेच बिग बी यांच्या चाहत्यांनी सकाळपासूनच त्यांच्या प्रतीक्षा या बंगल्याबाहेर गर्दी केली आहे. याही वयात अमिताभ हे तरुणांना लाजवेल अशा जोमात काम करत आहेत. आजचा हा खास दिवस मात्र ते साजरा करणार नाहीत अशी माहिती येत आहे. याचे कारण म्हणजे नुकतेच दिवंगत अभिनेते राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर यांचे निधन झाले. तसेच अमिताभ यांची कन्या श्वेता बच्चन हिचे सासरे राजन नंदा यांचे ऑगस्ट महिन्यात निधन झाल्याने त्यांनी वाढदिवस साजरा न करण्याचे ठरवले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

म्हाडाच्या घरांच्या लॉटरीत भ्रष्टाचार-निलेश राणे

रत्नागिरी – रविवारी मुंबईत निघालेल्या म्हाडाच्या लॉटरीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. याबाबत आपण कोर्टात जाणार असल्याचेही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

क्वीन कंगनाच्या ‘मणिकर्णिका’चा ट्रेलर प्रदर्शित

नवी दिल्ली – बॉलीवूडची क्वीन कंगना राणावतच्या बहुप्रतीक्षित ‘मणिकर्णिका; द क्वीन ऑफ झांसी’ चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनावर आधारित...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मुंबईत काही वर्षांत पावणे तीनशे किमी मार्गावर मेट्रो धावेल – मोदी

कल्याण – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते कल्याणमध्ये दाखल झाले असून त्यांच्या हस्ते ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो ५ मार्गाचे भूमिपूजन झाले आहे. ३३...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

#IPLAuction2019 आयपीएलच्या लिलावास सुरुवात

जयपूर – पुढील वर्षी सुरु होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या(आयपीएल) लिलावास सुरुवात झाली आहे. जयपूर येथील हा लिलाव पार पडत आहे. पुढील वर्षी मार्च महिन्याच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

कल्याणकरांकडून मोदींसाठी गाजराचे तोरण

कल्याण – आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो ५ मार्गाचे भूमिपूजन झाले. एकीकडे भूमिपूजनासाठी येणाऱ्या मोदींच्या स्वागतासाठी भाजपाकडून जय्यत तयारी करण्यात...
Read More