मोहिते-पाटलांचे कट्टर विरोधक डॉ. धवलसिंह शरद पवारांना भेटले – eNavakal
News निवडणूक महाराष्ट्र

मोहिते-पाटलांचे कट्टर विरोधक डॉ. धवलसिंह शरद पवारांना भेटले

पंढरपूर – राष्ट्रवादीच्या रणजितसिंह मोहिते-पाटलांनी काल भाजपात प्रवेश केला असतानाच त्यांचे कट्टर विरोधक असलेले चुलत बंधू आणि शिवसेनेचे सहसंपर्क नेते डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली.
धवलसिंह हे माजी सहकार राज्यमंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र असून अकलूज परिसरात मोठी ताकद असलेला युवक नेते म्हणून त्यांची ओळख आहे. सदाशिवनगर येथील शंकर सहकारी साखर कारखान्याचे 10 वर्षे अध्यक्ष असलेल्या धवलसिंह यांना काही महिन्यांपूर्वी रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी पराभूत करून कारखाना जिंकला होता. सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी सदस्य म्हणून काम केलेले असून अनेक संस्थांवर ते अध्यक्ष म्हणून काम करीत आहेत. मुंबईत तासभर धवलसिंह आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाली. बंद खोलीतील या चर्चेबाबत कमालीची गोपनियता पाळण्यात येत आहे. धनंजय मुंढे यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. यावेळी शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील हेसुद्धा उपस्थित होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

राहुल गांधी आज काश्मिरला जाणार

नवी दिल्ली- कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे विरोधी पक्षाच्या 9 नेत्यांसोबत आज  काश्मिरच्या दौर्‍यावर जाणार आहेत. जम्मू-काश्मिरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर राहुल गांधी यांचा...
Read More
post-image
News मुंबई

विमानतळ धावपट्टीवर अनधिकृत प्रवेश करणार्‍या तरुणाला अटक

मुंबई – विमानतळाच्या धावपट्टीवर अनधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी एका 24 वर्षांच्या तरुणाला काल विमानतळ पोलिसांनी अटक केली. कामरान अब्दुल हलीम शेख असे या आरोपी तरुणाचे...
Read More
post-image
News मुंबई

मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर रविवार 25 ऑगस्टला मेगाब्लॉक

मुंबई- मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी रविवार 25 ऑगस्ट रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याण-ठाणे अप जलद मार्गावर सकाळी 11.20...
Read More
post-image
News महाराष्ट्र

आम आदमी पार्टी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढवणार

मुंबई – राज्यात आगामी विधानसभा निवडणूकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले असताना आता ‘आम आदमी पक्षाने’ महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक लढविण्याची घोषणा केली आहे. ‘आप’चे राष्ट्रीय...
Read More
post-image
News महाराष्ट्र

डीएसकेंच्या 13 महागड्या गाड्यांचा लिलाव होणार

पुणे – गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केलेच्या आरोपाखाली सध्या तुरुंगात असलेले पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी अर्थात डीएसके यांच्या 13 महागड्या गाड्या लिलावात...
Read More