मोबाईल इंटरनेट वापरात भारतीयांचा पहिला नंबर – eNavakal
तंत्रज्ञान देश

मोबाईल इंटरनेट वापरात भारतीयांचा पहिला नंबर

नवी दिल्ली – भारतीयांचे  इंटरनेट प्रेम आता लपून राहिलेले नाही. लहान  मुले, तरूण, ज्येष्ठ नागरिक सगळेच  आजकाल स्मार्टफोनचा वापर करताना सर्रास दिसत आहेत. याच कारणामुळे आज भारत मोबाईल डेटा वापरण्यात जगात वरच्या क्रमांकावर गेला आहे. नीति आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दिलेल्या  माहितीनुसार अमेरिका आणि चीनसारखे देश याबाबतील भारताच्या जवळपासही नाहीत.

 

नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी शुक्रवारी ट्विट करून ही माहिती दिली. ‘अद्भुत! 150 करोड जीबी डेटाचा दरमहिन्याला वापर करण्याच्याबरोबर भारत डेटा वापरण्याच्याबाबतीत जगात पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे. भारताचा मोबाइल डेटाचा वापर चीन आणि अमेरिकेच्या संयुक्तपणे वापरपेक्षाही जास्त आहे, असं ट्विट अमिताभ कांत यांनी केलं.

दरम्यान, ही माहिती व आकडेवारीचा कुठलाही स्त्रोत अमिताभ कांत यांनी सांगितला नाही. त्यांचं हे ट्विट अनेकांना लाइक केलं असून अनेक रिट्विटही मिळाले आहेत.देशात रिलायन्स जिओ आल्यानंतर टेलिकॉम क्रांती झाल्याचं बोललं जातं. जिओनंतर विविधा टेलिकॉम कंपन्यांमध्ये डेटाप्लॅन्स बाजारात आणण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. याचाच सरळ परिणाम वापरकर्त्यांवर झाला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

औरंगाबादमधील तलावात बुडून एकाचा मृत्यू

औरंगाबाद – तलावात पोहण्यासाठी आलेल्या तीन युवकांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबादमधील कागजीपुरा आज दुपारी घटना घडली. नसीम खान मुबीन...
Read More
post-image
News क्रीडा देश

विश्वचषक स्पर्धेत भारताला चांगला खेळ करावा लागेल-राहुल द्रविड

मुंबई – आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत जेतेपद मिळवायचे असेल तर भारताला चांगला खेळ करावाच लागेल, असे भारताचा माजी कर्णधार आणि जुनिअर भारतीय संघाचे मुख्य...
Read More
post-image
News मुंबई

रासायनीक रंगामुळे सात जणांना बाधा

मुंबई- घाटकोपरमध्ये विषारी रासायनीक रंगामुळे सात जणांना बाधा झाल्याची घटना घडली. या सर्वांना महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. विषारी रासायनिक रंगाचा...
Read More
post-image
News अपघात मुंबई

गोरेगावमध्ये कारच्या धडकेत 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मुंबई – गोरेगाव येथे एका कारच्या धडकेने अरहान रमजान खान या चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरे पोलिसांनी हलगर्जीपणाने कार चालवून एका चार...
Read More
post-image
News महाराष्ट्र

बिबट्याच्या तीन बछड्यांचा मृत्यू

दिंडोरी – नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील परमोरी शिवारात बिबट्याच्या तीन बछड्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दोन मादी आणि एका नर...
Read More