केंद्र सरकारच्या कार्यकाळाचा मुख्यमंत्री फडणविसांनी वाचला पाढा – eNavakal
महाराष्ट्र

केंद्र सरकारच्या कार्यकाळाचा मुख्यमंत्री फडणविसांनी वाचला पाढा

मुंबई – भाजप सरकारच्या कार्यकाळाला काल ४ वर्षे पूर्ण झाली. याच भाजप सरकारच्या चौथ्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या गेल्या ४ वर्षांतील केलेल्या महत्त्वपूर्ण कामाचा पाढाच वाचून दाखवला.

राज्यातील ६२ लाखांहून अधिक घरांचं सौभाग्य योजनेअंतर्गत विद्युुतीकरण केले गेले आहे. गेल्या ४ वर्षात ३ कोटी ९८ लाख घरांना गॅस कनेकश्न मिळाले आहे. १५ हजार ग्रामपंचायती इंटरनेटने जोडल्या गेल्याचे त्यांनी या पत्रपरिषदेत सांगितले.

जनधन योजना सुरू केल्यापासून २ कोटी १८ लाख लोकांनी या योजनेअंतर्गत खाती सुरू केली आहेत. गेल्या 10 वर्षात आघाडी सरकारने जेवढी तुरीची खरेदी केली, त्यापेक्षा जास्त खरेदी आम्ही दोन वर्षांत केली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. केंद्राकडून राज्य सरकारला सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे. फसल विमा योजनेतंर्गत शेतकऱ्यांना मदत होत आहे. फसल विमा योजनेचा सर्वाधिक मदत महाराष्ट्राला मिळाली आहे. गेल्या ४ वर्षांत महाराष्ट्रात सर्वाधिक रोजगार निर्मीती झाली असून मोदी सरकार खंबीरपणे महाराष्ट्राच्या पाठीशी उभे असल्याचे त्यांनी सांगितले.

जनतेने सातत्याने निवडणूकीमध्ये मोदींवर मोठा विश्वास दाखवला आहे. लोकांनी नेहमी मोदी सरकारला पाठिंबा दर्शविला असून लोकांचे तेवढेच मोठे समर्थन महाराष्ट्रातही मिळाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कर्नाटक निवडणूकीनंतर सतत तेरा दिवस पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढलेल्या किंमतीमुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. केंद्र सरकार यावर उपाययोजना राबवत आहे. सरकारने आतापर्यत सर्व प्रश्नावर सकारात्मकतेने मार्ग काढत प्रश्न सोडवले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

पालघर पोटनिवडणूकी दरम्यान शिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांची ऑडिओ क्लिप उघड करण्यात आली होती. या ऑडिओ क्लिपमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास माझ्यावर कारवाई करा, संपूर्ण क्लिप निवडणूक आयोगाकडे सोपविण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. अर्घवट, काटछाट आणि छेडछाड केलेली माझी क्लिप प्रसिद्ध करणाऱ्यांवरही कारवाी करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र राजकीय

बीडमध्ये काकांच्या कारभारावर पुतण्याचा बॅनरबाजीतून निशाणा

बीड- बीडच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच काका-पुतणे आमने-सामने उभे राहणार असल्याने त्यांच्यातील संघर्ष गल्लीबोळातही दिसू लागला आहे. राज्याचे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या विकासकामांवर त्यांचे पुतणे संदीप...
Read More
post-image
News देश राजकीय

काँग्रेससोबत युती नको, स्वतंत्र लढणार – देवेगौडा

बंगळुरू- कर्नाटकामध्ये मध्यावधी निवडणूक होण्याची शक्यता आहे. जर तसे झाले तर कोणासोबतही युती न करता स्वतंत्र लढण्यासाठी तयार राहू, असे माजी पंतप्रधान आणि जनता...
Read More
post-image
News महाराष्ट्र

उरण वीज प्रकल्पाचा गॅसपुरवठा पूर्ववत

उरण- उरण ओएनजीसीच्या गॅस प्रकल्पाला लागलेल्या आगीमुळे गेल्या 10 दिवसांपासून बंद असलेला महानिर्मितीच्या उरण वीज प्रकल्पाचा गॅसपुरवठा कालपासून पूर्ववत सुरू झाला आहे. यामुळे एका...
Read More
post-image
News महाराष्ट्र वाहतूक

बोरोटी रेल्वे यार्डमध्ये ब्लॉक! कलबुर्गी-सोलापूर पॅसेंजर रद्द

सोलापूर- मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील सोलापूर वाडी सेक्शनच्या बोरोटी रेल्वे स्थानक यार्डमध्ये उद्या बुधवारी ट्रॉफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकच्या काळात प्रवासी गाड्यांमध्ये...
Read More
post-image
News महाराष्ट्र राजकीय

इंदुरीकर महाराजांचा मलाच पाठिंबा! बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया

अहमदनगर- संगमनेरयेथे मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज दिसल्यानंतर ते बाळासाहेबांच्या विरोधात लढणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. मात्र स्वत: इंदुरीकर महाराजांनी हे वृत्त...
Read More