मोदी सरकारच्या काळात अर्थव्यवस्था कोलमडली-राहुल गांधींचा घणाघात – eNavakal
News महाराष्ट्र

मोदी सरकारच्या काळात अर्थव्यवस्था कोलमडली-राहुल गांधींचा घणाघात

नांदेड – पाच वर्षापासून नरेंद्र मोदी सरकार चालवत आहेत. त्यांनी जीएसटी म्हणजेच गब्बरसिंग टॅक्स लावला. या टॅक्समुळे अर्थव्यवस्था कोलमडली. अनेकांच्या नोकर्‍या गेल्या. 45 वर्षात नव्हती एवढी बेरोजगारी वाढली, अशी घणाघाती टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर केली.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची आज नांदेडातील नवामोंढा मैदानावर प्रचारसभा झाली. या सभेमध्ये राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या आर्थिक आणि शेतीविषयक धोरणांवर जोरदार टीका केली. मोदींनी गब्बरसिंग टॅक्स लावला. अर्थव्यवस्था कोलमडली. अनेकांच्या नोकर्‍या गेल्या. असा टोला राहुल गांधी यांनी लगावला. दोन कोटी तरुणांना दरवर्षी रोजगार आणि शेतीला हमीभाव देण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते. मात्र प्रत्यक्षात त्यांनी शेतकरी आणि तरुणांची फसवणूक केली असल्याची टीकाही राहुल गांधींनी केली. यावेळी राफेल विमान करारावरूनही राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला. मोदी स्वतःला चौकीदार समजतात, परंतू हा चौकीदार गरीबांचा, शेतकर्‍यांचा, मजूरांचा नाही अनिल अंबानीचा केली आहे. 30 हजार कोटी थेट अनिल अंबानीला फायदा झाला. राफेल प्रकरणी मी नरेंद्र मोदींना संसदेत प्रश्न विचारले. किंमत का वाढली, अंबानीलाच का काम दिले, एचएएलला काम का दिले नाही. पण माझ्या एकाही प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले नाही. नरेंद्र मोदी संसदेत दीड तास बोलले, नेहरु, इंदिरा गांधी, सगळ्यावर बोलले पण राफेलवर काहीच बोलले नाहीत, असे राहुल गांधी म्हणाले. जर श्रीमंतांचे पैसे माफ होऊ शकतात, अनिल अंबानीचे पैसे माफ होऊ शकतात तर तुमच्या खात्यात 72 हजार का जमा होऊ शकत नाहीत, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
2019 च्या निवडणुकीनंतर काँग्रेसचे सरकार आल्यावर स्वतंत्र कृषी बजेट सादर केले जाईल. कर्ज फेडू न शकलेल्या कोणत्याही शेतकर्‍याला जेलमध्ये जावे लागणार नाही. काँग्रेसचे सरकार येताच कायद्यात योग्य ते बदल केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
मनोरंजन

ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नाच्या वाढदिवसाचे फोटो पाहिलेत?

माले – अभिषेक-ऐश्वर्या या बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध जोडीच्या लग्नाला शनिवारी तब्बल १२ वर्ष पूर्ण झाली. आपल्या लग्नाचा १२ वा वाढदिवस या दोघांनी मालदीवमध्ये साजरा केला....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या निवडणूक महाराष्ट्र

तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस

मुंबई – लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. या टप्प्यात २३ एप्रिलला राज्यातल्या १४ मतदारसंघांत मतदान होणार आहे. यामध्ये जळगाव, रावेर,...
Read More
post-image
अपघात आघाडीच्या बातम्या देश

आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ७ ठार ३४ जखमी

मैनपुरी – उत्तर प्रदेशमध्ये आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर ट्रक आणि बसच्या भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ३४ जण गंभीर जखमी झाले आहेत....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#IPL2019 दिल्लीचा पंजाबवर सहज विजय

नवी दिल्ली – आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेतील शनिवारच्या दुसर्‍या लढतीत दिल्लीने पंजाबवर सहज विजय मिळवला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करणार्‍या पंजाबला १६३ धावांत रोखण्यात यश...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगा ब्लॉक

मुंबई – मध्य, पश्‍चिम, हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून, पश्‍चिम मार्गावरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान डाऊन जलद लाईनवर आज सकाळी 10.35...
Read More