मोदी सरकारची ‘जिओ’साठी खेळी – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

मोदी सरकारची ‘जिओ’साठी खेळी

मुंबई – मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स उद्योग समूहाच्या ‘जिओ’ मोबाईलवर 2019 च्या नवीन वर्षापासून इंटरनेट आणि रिलायन्सनी विकत घेतलेले ‘आयबीएन’सारखे चॅनल मोफत दिले जाणार आहेत. त्यामुळे ‘जिओ’चे ग्राहक वाढणारच आहेत. पण एकही ग्राहक दुसरीकडे जाऊ नये यासाठी केबल टीव्ही महाग करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी मोदी सरकारने ‘ट्राय’ला कामाला लावले आहे. त्यामुळे जिओवर मोफत इंटरनेट आणि काही चॅनल मोफतची घोषणा होईल तेव्हाच केबलचे भाडे भरमसाठ वाढण्याची कीमया घडणार आहे.

टेलिफोन नियामक प्राधिकरणाने (ट्राय) केबलवाल्यांसाठी नवीन नियमावली काढली आहे. त्यानुसार केबलवरून चॅनल पाहायचे असतील तर ग्राहकाला किमान 150 रुपये प्राथमिक भाडे द्यावेच लागेल. त्यानंतर प्रत्येक चॅनलपोटी महिना 19 ते 25 रुपये भरावे लागतील. म्हणजे हिंदी वा मराठी करमणूक चॅनलला प्रत्येकी 19 रुपये महिना, क्रीडा वाहिन्यांसाठी महिना 25 रुपये असे चॅनलना वेगवेगळे दर ठरविण्यात आले आहेत. म्हणजे सामान्य ग्राहकांना आज 400 रुपये भाड्यात सर्व चॅनल पाहायला मिळतात. पण जानेवारीत ट्रायचे नियम लागू झाले की स्थिती बदलेल.

केबलवर चॅनल पाहायचे तर प्रथम 150 रुपये भरावे लागतील. मग कमीत कमी सिरीयल दाखविणारे 4 चॅनल आणि एक क्रीडा वाहिनी असे पाच चॅनल घ्यायचे तर प्रत्येक चॅनलचे भाडे धरून महिना 250 रुपये द्यावे लागतील. मराठी, हिंदी करमणूक वाहिन्या, क्रीडा वाहिन्या, डिस्कव्हरी, अ‍ॅनिमल प्लॅनेट असे 20 चॅनल घ्यायचे ठरविले तर महिना साधारण 591 रुपये भरावे लागणार आहेत. त्याउलट ‘जिओ’वर इंटरनेट मोफत आणि रिलायन्सने विकत घेतलेली चॅनल मोफत दिसणार आहेत. त्यामुळे ‘ट्राय’च्या कृपेने केबलचे ग्राहक तुटून ‘जिओ’कडे जातील. एकदा केबलचा पूर्ण सफाया झाला की, जिओ आपला भांडवलदारी चेहरा दाखवित वाहिन्यांसाठी वाटेल ते भाडे आकारण्यास सुरुवात करील. मोदी सरकारच्या आशीर्वादाने ‘ट्राय’च्या हालचाली सुरू आहेत. यामुळे केबलचालक बिथरले आहेत. त्यांची आणि ट्रायची आज सकाळी बैठक झाली. मात्र ही पहिली प्राथमिक बैठक असल्याने महत्त्वपूर्ण काहीच घडले नाही.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राज्य मंत्रिमंडळ विस्तार! पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना

मुंबई – लोकसभा निवडणुकीनंतर सतत होणार्‍या टोलवा टोलवीनंतर अखेर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज रविवारी सकाळी पार पडला असून पहिल्या शपथविधीचा मान काँग्रेस राष्ट्रवादीतून नुकतेच...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

उद्धव ठाकरेंनी खासदारांसह घेतले रामलल्लांचे दर्शन

अयोध्या – हिंदुत्व व राम मंदिराचा मुद्या पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शनिवारी अयोध्येमध्ये हिंदू धर्माचे शंकराचार्य यांच्यासहित डझनभर संत-महंत तसेच भाजपा व संघाचे...
Read More
post-image
देश

राजस्थानची सुमन राव ठरली फेमिना मिस इंडिया २०१९

नवी दिल्ली – फेमिना मिस इंडिया या स्पर्धेचा अंतिम टप्पा शनिवारी मुंबईच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये पार पडला. एकूण ३० स्पर्धकांशी लढत आपल्या सौंदर्य...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : अमेरिकन अभिनेते स्टॅन लॉरेल

आज अमेरिकन अभिनेता, लॉरेल व हार्डीचा अर्धा भाग स्टॅन लॉरेल यांचा स्मृतिदिन. त्यांचा जन्म. १६ जुन १८९० साली झाला. साल १९२६पासून या जोडीने खरी...
Read More
post-image
देश विदेश

फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल

नवी दिल्ली – आज १६ जून फादर्स डे. या दिनानिमित्त गुगलने खास डूडल तयार केलं आहे. या डूडलमधून वडील आणि मुलामधलं निखळ नातं दाखविलं...
Read More