मोदींना सत्तेवर बसवून घोडचूक, जेठमलानींकडून पंतप्रधान लक्ष्य – eNavakal
News महाराष्ट्र राजकीय

मोदींना सत्तेवर बसवून घोडचूक, जेठमलानींकडून पंतप्रधान लक्ष्य

पुणे – देशाच्या जनतेने नरेंद्र मोदींना सत्तेवर आणून देशाची धुरा त्यांच्याकडे सोपवली. मात्र, आता आपण घोडचूक केल्याचे जनतेला कळून चुकले आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ विधीज्ञ व खासदार अ‍ॅड. राम जेठमलानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टीकेचे लक्ष्य केले. पुढील निवडणुकीनंतर मोदी केवळ पायउतारच होणार नाहीत, तर कदाचित देशाबाहेरही निघून जातील, असे भाकितही त्यांनी यावेळी वर्तविले.
सिंबासोसिस लॉ स्कूलतर्फे विधी दिनानिमित्त आयोजित न्या. यशवंतराव चंद्रचूड स्मृती व्याख्यान आयोजिण्यात आले होते. राज्याचे महाधिवक्ता अ‍ॅड. आशुतोष कुंभकोणी यांनी हे व्याख्यान दिले. अ‍ॅड. जेठमलानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार आणि लॉ स्कूलच्या संचालिका शशिकला गुरपूर यावेळी उपस्थित होत्या. नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषणा झाली. त्यानंतर ते सत्तेवर यावेत, यासाठी अनेकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. ते यशस्वीही झाले. त्यावेळी मोदी यशस्वी व्हावेत, ही अनेकांची इच्छा होती. मात्र, आता आपण घोडचूक केली, अशी भावना नागरिकांच्या मनात आहे, असे जेठमलानी यांनी सांगितले. पुढील निवडणुकीत मोदींना सत्ता गमवावी लागणार आहे. त्यामुळे ते देशाबाहेर निघून जातील, असेही  जेठमलानी म्हणाले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

बुलढाण्यात कारमध्ये गुदमरून दोन मुलांचा मृत्यू

बुलढाणा – कारमध्ये गुदमरून दोन बालकांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बुलढाण्यात घडली आहे. तर एक पाच वर्षांची चिमुकली गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत....
Read More
post-image
महाराष्ट्र

विशेष मागासवर्गाच्या आरक्षणाची अंमलबजावणी १५ दिवसात करणार

मुंबई – विशेष मागास प्रवर्गाला महाराष्ट्र शासनाने १९९४ साली २ टक्के आरक्षण दिले आहे. मात्र आजवर शिक्षण व नोकरीत या आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव प्रकरणाचा उद्या निर्णय

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयात उद्या 17 जुलै रोजी दुपारी 3 वाजता...
Read More
post-image
देश

कर्नाटकातील कॉंग्रेसच्या बंडखोर आमदाराला अटक

बंगळुरू – कर्नाटकमधील कॉंग्रेसचे बंडखोर आमदार रोशन बेग यांना सोमवारी बंगळुरू विमानतळावरून एसआयटीने ताब्यात घेतले आहे. बंगळुरूहून मुंबईला येत असताना आयएमए घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई...
Read More
post-image
देश

आज वर्षातील दुसरे चंद्रग्रहण दिसणार

नवी दिल्ली – वर्षातील दुसरे चंद्रग्रहण आज आषाढ पौर्णिमेच्या रात्री दिसणार आहे. हे खंडग्रास चंद्रग्रहण असून ते संपूर्ण भारतातून रात्री उशिरा तीन तास दिसेल. रात्री...
Read More