मोदींच्या सुरक्षेत वाढ, अज्ञाताकडून हल्ल्याची शक्यता – eNavakal
News आघाडीच्या बातम्या देश राजकीय

मोदींच्या सुरक्षेत वाढ, अज्ञाताकडून हल्ल्याची शक्यता

नवी दिल्ली – काही दिवसापूर्वी पंतप्रधान मोदींना मारण्याचा कट रचल्याचे समोर आले होते. या कथित माहितीनुसार केंद्रीय गृह मंत्रालयाने त्यांच्या सुरक्षेबाबत नव्या मार्गदर्शक सुचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, विशेष सुरक्षा गटाकडून परवानगी मिळाल्याशिवाय कोणत्याही मंत्र्याला किंवा अधिकाऱ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जवळही जाता येणार नाही.  मोदींच्या जीवाला सध्या सर्वाधिक धोका असल्याचे सुरक्षा अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

गृह मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार, मोदींवर अज्ञातांकडून हल्ल्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्री आणि अधिकाऱ्यांनाही त्यांच्या विशेष सुरक्षा गटाच्या परवानगीशिवाय जवळही जाता येणार नाही. त्याचबरोबर आगामी निवडणुकांमध्ये भाजपाचे मुख्य प्रचारक असलेल्या मोदींनी रोड शो कमी करुन त्याऐवजी केवळ प्रचार सभांवरच भर द्यावा असे सुरक्षा गटाने त्यांना सुचवले आहे.

पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या क्लोज प्रोटेक्शन टीमलाही (सीपीटी) या नव्या नियमांची माहिती देण्यात आली आहे. सीपीटीला धोक्याची सूचना देण्यात आली असून गरज पडल्यास मंत्री आणि अधिकाऱ्यांचीही तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत.

पुण्यात काही दिवसांपूर्वी कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात काही नक्षलवादी संघटनांशी संबंधीत लोकांना ताब्यात घेण्यता आले. त्यांना कोर्टात हजर केल्यानंतर पुणे पोलिसांनी कोर्टासमोर सांगितले की, दिल्लीतून अटक केलेल्या एका आरोपीच्या घरातून एक पत्र सापडले असून त्यात माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या हत्येप्रमाणे नरेंद्र मोदींच्या हत्येच्या कटाचा कथित उल्लेख असल्याचे सांगितले होते. त्यानंतर मोदींच्या सुरक्षेचा वाढ करण्यात आली आणि या नव्या मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

विराटची टीम इंडिया आज वेस्ट इंडीजला भिडणार

चेन्नई – टी-२० मालिकेपाठोपाठ आजपासून भारत-वेस्ट इंडीज यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला प्रारंभ होत आहे. विराट कोहलीचा भारतीय संघ दक्षिण आफ्रिका, बांगलादेश यांच्यापाठोपाठ आता...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

आज दुपारी १२ वाजता विरोधी पक्षांची बैठक; १ वाजता पत्रकार परिषद

नागपूर – उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरण्याची रणनीती आखण्याबाबत आज विरोधी पक्षांची बैठक पार पडणार आहे. आज दुपारी १२ वाजता रविभवनातील विरोधी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

अरेरे! उद्यापासून दूध महागणार

पुणे – इंधन आणि कांद्याच्या दरवाढीनंतर आता दूधाच्या किंमतीही वाढणार आहेत. राज्यात गायीचे दूध सोमवारपासून लिटरमागे दोन रुपयांनी महागणार आहे. त्यामुळे गायीच्या दुधाच्या एका लिटरसाठी...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश

आजपासून चारचाकी वाहनांना महामार्गावर ‘फास्ट टॅग’ सुरू

नवी दिल्‍ली- चारचाकी वाहनाधारकांचा प्रवास वेगवान होण्यासाठी आज रविवारपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून ‘फास्ट टॅग’ सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या वाहनांना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; नव्या सरकारची परीक्षा

नागपूर – राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होणार असून यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा कस लागणार आहे. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...
Read More