मॉल्स उघडली जातात मग मंदिरं का नाही? राज ठाकरेंचा सरकारला सवाल – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मॉल्स उघडली जातात मग मंदिरं का नाही? राज ठाकरेंचा सरकारला सवाल

मुंबई – राज्यातील मॉल्स उघडू शकतात तर मग मंदिरं का नाही, असा खडा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला विचारला आहे. योग्य खबरदारी घेऊन मंदिरं उघडली पाहिजेत, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे. आज त्र्यंबकेश्वरच्या पुजाऱ्यांचं एक शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला आलं होतं. त्यांनी महाराष्ट्रातली मंदिरं सुरु करण्याबाबत राज ठाकरेंकडे निवेदन दिलं. त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ही भूमिका मांडली आहे.

लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून राज्यातील मंदिरं बंद आहेत.  कोणतीही गर्दीही होऊ नये आणि कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून हा निर्णय सरकारने घेतला. मात्र आता ऑगस्ट महिना उजाडला आहे. अशात हळूहळू अनलॉकच्या दिशेने आपण जातो आहोत. असं सगळं असताना मंदिरं उघडण्यास काय हरकत आहे? योग्य खबरदारी घेऊन जर मॉल्स उघडले जाऊ शकतात, दुकानं उघडली जाऊ शकतात तर मंदिरं का उघडण्यात येत नाहीत? असे प्रश्न राज ठाकरेंनी विचारले आहेत.

दरम्यान आज राज ठाकरेंना त्र्यंबकेश्वरच्या पुजाऱ्यांचं शिष्टमंडळ भेटलं. त्यांच्या भेटीनंतर पुजाऱ्यांच्या शिष्टमंडळानेही समाधान व्यक्त केलं आहे. उद्या श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस आहे. अजूनही मंदिरं बंद आहेत. म्हणून आमचं शिष्टमंडळ मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला आलं होतं. आम्हाला त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर समाधान वाटतं आहे. राज ठाकरेंना भेटल्यानंतर मंदिरं उघडण्याच्या निर्णयाबाबत काहीतरी सकारात्मक घडेल असा आम्हाला विश्वास आहे असं पुजाऱ्यांनी म्हटलं आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन महाराष्ट्र

दिग्दर्शक निशिकांत कामत यांची प्राणज्योत मालवली, रितेश देशमुखने दिली ट्विटरवरून माहिती

हैदराबाद – दिग्दर्शक निशिकांत कामत यांची प्राणज्योत मालवली आहे. वयाच्या ५० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हैदराबादमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अभिनेता...
Read More
post-image
मनोरंजन

जॅकलीन फर्नांडीसने महाराष्ट्रातील दोन गावे घेतली दत्तक

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, अनेक बॉलीवुड कलाकारांनी गरजू लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. त्याचप्रमाणे आपल्या जन्मदिनी (11 ऑगस्ट), जॅकलीन फर्नांडीसने महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील दोन गावे,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

मलेशियात आढळला कोरोनाचा नवीन प्रकार, १० पटीने होतोय संसर्ग

जगभर थैमान घातलेल्या कोरोनाचा नवीन प्रकार मलेशियात सापडला आहे. धक्कादायक म्हणजे या विषाणूचा संसर्ग सध्याच्या विषाणूपेक्षा १० पट अधिक वेगाने होतोय.  या विषाणूचे नाव...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मॉल्स उघडली जातात मग मंदिरं का नाही? राज ठाकरेंचा सरकारला सवाल

मुंबई – राज्यातील मॉल्स उघडू शकतात तर मग मंदिरं का नाही, असा खडा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला विचारला आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र

दिल्लीत गणपती आणि मोहरमच्या मिरवणुकांवर कोरोनामुळे बंदी

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत यावेळी दिल्लीत मोहरमच्या मिरवणुका आणि गणेश आगमन मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली आहे....
Read More