मॉब लिंचिंग ही परदेशी संस्कृती आहे – सरसंघचालक – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मॉब लिंचिंग ही परदेशी संस्कृती आहे – सरसंघचालक

नागपूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात म्हणजेच नागपूरमधील रेशीमबागमध्ये दरवर्षीप्रमाणे आजही विजयादशमी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोदी सरकारचे तोंडभरून कौतुक केले. कलम 370 रद्द करून सरकारने धाडसी निर्णय घेणारे सरकार असल्याचे दाखवून दिले आहे, असे म्हणत त्यांनी मोदी सरकारची पाठ थोपटली. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नेहमीच मॉब लिंचिंगच्या घटनांशी संबंध जोडला जातो, अशा घटनांशी संघाचा काहीही संबंध नाही, असे सांगतानाच लिंचिंग हा शब्दच भारतातला नसून, मॉब लिंचिंग ही परदेशी संस्कृती आहे, असे वक्तव्यदेखील त्यांनी केले. मॉब लिंचिंगसारखे शब्द वापरून हिंदू समाजाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. विशिष्ट समुदायाप्रती सहानुभूती व्यक्त करण्यात येत असताना आपसी संघर्ष वाढवण्यात येत आहे, यापासून सतर्क राहण्याची गरज आहे, असे भागवत म्हणाले. त्यांनी यावेळी अनेक राजकीय, समाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक मुद्द्यांवर भाष्य केले.

देशात आलेल्या आर्थिक मंदीबाबत बोलताना त्यांनी ‘भारतातील आर्थिक मंदी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने फार चांगले काम केले आहे. या सरकारने उपाययोजना नक्कीच केल्या आहेत. तेव्हा देशातील आर्थिक मंदीवर सातत्याने चर्चा करणे योग्य ठरणार नाही’, असे म्हटले.

तसेच मॉब लिंचिंगवर बोलताना भागवत यांनी येशू ख्रिस्त आणि गौतम बुद्धांच्या काळातील उदाहरणे दिली. येशू ख्रिस्ताच्या काळात एका स्त्रीवर सर्वांनी हल्ला केला, लोक तिला दगड मारू लागले. मात्र ज्याने पाप केले नाही, त्यानेच पहिला दगड मारावा असे येशू ख्रिस्ताने सांगितले. गावात पाण्यावरून झालेले भांडण गौतम बुद्धाने सोडवले असे सांगत लिंचिंग हा शब्द आपल्याकडील नाही, तो बाहेरून आला असे भागवत यांनी म्हटले.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

महाराष्ट्रासाठी कोरोना ठरतोय धोक्याची घंटा

मुंबई – राज्यात गेल्या 2 दिवसांत कोरोना संसर्गाच्या नवीन 113 रुग्णांची संख्या झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्णांचा आकडा 748 इतका झाला आहे. आतापर्यंत 56...
Read More
post-image
मुंबई

मरकजला गेलेल्यांनी संपर्क केला नाहीतर कारवाई करू – मुंबई मनपा

मुंबई – राजधानी दिल्लीत तबलिगी मकरजला जे गेले होते, त्यांनी ताबडतोब मुंबई महापालिकेशी १९१६ या क्रमांकावर संपर्क साधावा आणि आपल्या प्रवासाची माहिती द्यावी, असे...
Read More
post-image
महाराष्ट्र

अंबरनाथमध्ये कोरोनाचा पहिला बळी

ठाणे – जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये सापडलेल्या पहिल्या रुग्णाचा आज मृत्यू झाला. त्याच्यावर मुंबईतील भाभा रुग्णालयात उपचार सुरु होते. अंबरनाथमधील बुवापाडा परिसरातील व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे...
Read More
post-image
देश

मुंबईतही ‘ऑनलाईन लग्न’ वऱ्हाडी मंडळीही उपस्थित

मुंबई – लॉकडाऊन असताना आता मुंबईतही एका तरुणाचा ऑनलाईन लग्न सोहळा पार पडला. विशेष म्हणजे या लग्न सोहळ्यात दोन्ही बाजूची वऱ्हाडी मंडळी सहभागी झाली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

भाजपच्या ४० व्या स्थापनादिनी मोदींनी कार्यकर्त्यांना दिले ५ संकल्प

नवी दिल्ली – कोरोनाचा हाहाकर उडालेला असतानाच आज भाजचा स्थापना दिन आहे. या स्थापनादिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी...
Read More