मेहुल चोक्सीची कंपनी बँका विकणार – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

मेहुल चोक्सीची कंपनी बँका विकणार

मुंबई  – पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला कर्जदात्या बँकांनी मोठा दणका दिला आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमधील गीतांजली जेम्स कंपनी विक्रीला काढली जाणार आहे. कर्ज देणार्‍या बहुतांश बँकांनी निराकरण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दिलेली 180 दिवसांची मुदत वाढवण्यास नकार दिला आहे. गीतांजली जेम्सचे अधिकारी विजय कुमार गर्ग यांनी स्टॉक एक्स्चेंजला ही माहिती दिली. सीओसीनं कर्ज निराकरण प्रक्रियेसाठी दिलेली मुदत वाढवण्यास नकार दिला आहे. त्यामुळं आता कंपनी विकण्यात येणार आहे,’ असं गर्ग यांनी सांगितलं. ऑक्टोबर 2018मध्ये एनसीएलटीच्या मुंबई शाखेनं कंपनीविरोधात आयसीआयसीआय बँकेनं दाखल केलेली याचिका स्वीकारली होती. मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांनी पीएनबी बँकेत केलेल्या घोटाळ्यावर सरकारी यंत्रणांनी चौकशी सुरू केल्यानंतर या प्रकरणात दाखल केलेली ही पहिली याचिका होती. गीतांजली जेम्स या कंपनीकडे बँकांची 12, 558 कोटी रुपये थकबाकी आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
मनोरंजन

ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नाच्या वाढदिवसाचे ‘हे’ फोटो पाहिलेत?

माले – अभिषेक-ऐश्वर्या या बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध जोडीच्या लग्नाला शनिवारी तब्बल १२ वर्ष पूर्ण झाली. आपल्या लग्नाचा १२ वा वाढदिवस या दोघांनी मालदीवमध्ये साजरा केला....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या निवडणूक महाराष्ट्र

तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस

मुंबई – लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. या टप्प्यात २३ एप्रिलला राज्यातल्या १४ मतदारसंघांत मतदान होणार आहे. यामध्ये जळगाव, रावेर,...
Read More
post-image
अपघात आघाडीच्या बातम्या देश

आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ७ ठार ३४ जखमी

मैनपुरी – उत्तर प्रदेशमध्ये आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर ट्रक आणि बसच्या भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ३४ जण गंभीर जखमी झाले आहेत....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#IPL2019 दिल्लीचा पंजाबवर सहज विजय

नवी दिल्ली – आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेतील शनिवारच्या दुसर्‍या लढतीत दिल्लीने पंजाबवर सहज विजय मिळवला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करणार्‍या पंजाबला १६३ धावांत रोखण्यात यश...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगा ब्लॉक

मुंबई – मध्य, पश्‍चिम, हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून, पश्‍चिम मार्गावरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान डाऊन जलद लाईनवर आज सकाळी 10.35...
Read More