मेन्टेनन्सचे पैसे भरून घरांची डागडुजी का नाही? – eNavakal
News मुंबई

मेन्टेनन्सचे पैसे भरून घरांची डागडुजी का नाही?

मुंबई – शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला दरमहा मेन्टन्सचे पैसे भरूनही आमच्या घरांच्या डागडुजीचे काम का केूले जात नाही? असा संतप्त सवाल वांद्रे (पूर्व)च्या शासकीय कर्मचारी वसाहतीतील रहिवाशी विचारत आहेत.

या वसाहतीत 370 इमारती आहेत. तर 4400 खोल्या आहेत. अनेक खोल्यांची पडझड झाली आहे. इतकेच नव्हे तर गेले काही महिने छतांचे प्लास्टर कोसळण्याच्या घटना घडत असल्याने स्थानिकांत भीतीचे वातावरण आहे.
यंदाच्या वर्षी पावसाळ्यापूर्वी इमारतीच्या खोल्याची केली जाणार्‍या दुरुस्तीच्या कामाला शासनाने तिलांजली दिल्याचे बोलले जाते. आमच्या पगारातून खोल्यांचे मेन्टेनन्सची रक्कम दरमहा कापली जाते. मग शासनाचे सार्वजनिक विभाग खोल्याच्या दुरुस्तीचे काम का करत नाही? असा सवाल करत येथील रहिवाशी पुढे म्हणाले, सध्या दुरुस्तीच्या कामाची तक्रार संबंधित विभागाकडे करायला गेल्यास खोल्या रिकामी करण्याच्या नोटीसा दिल्या जातात. या प्रकारामुळे रहिवाशी तक्रार करण्यास धजावत नाहीत, अशी चर्चा आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मुंबई

मुंबईतील पाणी प्रश्न स्थायी समितीत पेटला

मुंबई  – मुंबईतील पाणी प्रश्न आज बुधवारी पालिका स्थायी समितीत चांगलाच पेटला सर्वपक्षीय सदस्यांनी आक्रमक होत पालिकेला धारेवर धरले पाणी टंचाईचा प्रश्न सोडवण्याची मागणी...
Read More
post-image
देश

चंद्रशेखर राव आज घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

हैदराबाद – तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव हे उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ ़घेणार आहेत. त्यांच्या शपथविधीसाठी विविध राजकीय पक्षांचे नेते, निमंत्रित पाहुणे उपस्थित...
Read More
post-image
मुंबई

मुंबईत वातावरणातील बदलाने आजार बळावले

मुंबई – दिवसा रणरणते ऊन आणि रात्रीचा गारवा वातावरणातील या बदलामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. सर्दी, खोकला, दमा, त्वचारोगांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. डिसेंबर...
Read More
post-image
विदेश

ब्राझीलच्या कँपीनास शहरात गोळीबारात 5 ठार

साओ पाउलो- ब्राझीलच्या कँपीनास शहराती एका चर्चमध्ये बंदुकधार्‍याने केलेल्या गोळीबारात 5 भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना काल घडली. या घटनेनंतर गोळीबार करणार्‍या व्यक्तीनेही स्वतःवर गोळ्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात आज पहिला गुरुवार

विक्रमगड – शनिवारपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली असून या महिन्यात अनेकांच्या घरात उपवास केला जातो व श्रावण महिन्याप्रमाणेच मास,मच्छी या महिन्यात वर्ज्य केली जाते.या...
Read More