मेडिकल लॉबीवर राज्य सरकारची मेहर नजर का ? – हायकोर्ट – eNavakal
न्यायालय मुंबई

मेडिकल लॉबीवर राज्य सरकारची मेहर नजर का ? – हायकोर्ट

मुंबई- वैद्यकिय बिल भरण्यास असमर्थ असणार्‍या रूग्णाला डिस्चार्ज न देण अथवा निधन झालेल्या रूग्णाचा मृत देह देण्यास नकार देणे असे प्रकार वारंवार घडत असल्याने राज्य भरातील सर्व खाजगी हॉस्पिटल्सवर नियंत्रण आणणार्‍या क्लिनिकल एस्टाब्लिशमेंट अ‍ॅक्ट लागू करण्याची प्रक्रिया सुरु होऊन दोन वर्ष झाली, तरी अजूनही कायदा का लागू करण्यात आला नाही्? राज्य सरकारची मेडिकल लॉबीवर ऐवढी मेहर नजर का ? असे प्रश्न उपस्थित करून उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या कारभारावर तिव्र नाराजी व्यक्त केली.
बेकायदा नर्सिंग होम आणि बनावट डॉक्टरकडून झालेल्या चुकीच्या वैद्यकीय उपचारांमुळे वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर पुण्यातील अतुल भोसले यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीच्यावेळी न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरिष कुलकणी यांच्या खंडपीठा समोर आज सुनावणी झाली यावेळी याचिकाकर्त्यांनी न्यायालयाने ऑक्टोंबर 2017 मध्ये अशा नर्सिंग होम व रुग्णालयांवर तपासणी करुन कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. तसेच यासंदर्भात आरोग्य संचालकांना दरमहा उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारकडे अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र हे स्पष्ट आदेशाचे राज्य सरकारकडून पालन होत नसल्याचा आरोप केला. यावेळी न्यायालयाने राज्य सरकारच्या कारभारावर तिव्र नाराजी व्यक्त करून राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करण्यासाठी अ‍ॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांना शुक्रवारी हजर राहण्याचे निर्देश दिले.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

कुकडी नदीवरील बंधारा पाण्याअभावी कोरडाच

कवठे येमाई – शिरूर तालुक्यातील म्हसे बुद्रुक येथील कुकडी नदीवरील बंधारा अखेर पाण्याअभावी कोरडाच राहिला असून पाणी न आल्यास या प्रश्नी तीव्र आंदोलन करण्याचा कडक...
Read More
post-image
News देश निवडणूक

बिहारमध्ये महाआघाडीचे जागावाटप जाहीर

पाटणा – लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमध्ये आज महाआघाडीच्या जागावाटपाची घोषणा झाली. राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस, हिंदुस्थानी आवाम मोर्चा, राष्ट्रीय लोक समता पार्टी या पक्षांच्या महाआघाडीने...
Read More
post-image
News महाराष्ट्र

एलईडी मासेमारी विरोधात मच्छिमार आक्रमक

रत्नागिरी – एलईडी मासेमारी विरोधात मच्छिमार आता आक्रमक झाले आहेत. याच विषयासंदर्भात रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांची एक समन्वय समिती स्थापन करण्यात...
Read More
post-image
News देश

फुटीरतावादी यासिन मलिकच्या संघटनेवर केंद्र सरकारची बंदी

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला केंद्र सरकारने आणखी एक दणका दिला आहे. यासिन मलिकच्या ‘जम्मू-काश्मीर लिब्रेशन फ्रंट’वर केंद्र सरकारने बंदी घातली आहे....
Read More
post-image
News महाराष्ट्र

आजरा कारखान्याच्या कर्मचार्‍यांनी अध्यक्षांच्या दालनाला ठोकले टाळे

कोल्हापूर – आजरा साखर कारखाना कर्मचारी व सत्ताधारी मंडळींचा संघर्ष टोकाला गेला असून आज कर्मचारी संघटनेने बोलाविलेल्या बैठकीला अध्यक्ष अशोक चराटी व उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी...
Read More