मेट्रो-2 बीसाठी खांब उभारण्याच्या कामावरील स्थगिती कोर्टाकडून कायम – eNavakal
News मुंबई

मेट्रो-2 बीसाठी खांब उभारण्याच्या कामावरील स्थगिती कोर्टाकडून कायम

मुंबई,- मेट्रो-2 बीचे काम करण्यासाठी विधी सरकारी परवानग्यांची आवश्यकता नसतानाही मेट्रो प्रशासनाने अतिरीक्त परवानग्याही घेतल्या आहेत, असा दावा एमएमआरडीएने आज मुंबई उच्च न्यायालयात केला. मात्र प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने दिलासा देण्यास नकार दिला. खांब उभारण्यासाठी परवानगी देण्याची मागणी फेटाळून लावत या कामावरील स्थगिती कायम ठेवली.

मेट्रो 2 बीच्या मानखुर्द मंडाळे ते डीएन नगर अंधेरी या मार्गावरील कामामुळे वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर एच वेस्ट वॉर्ड सिटीझन ट्रस्टच्यावतीने मेट्रोचे काम भुयारी करा, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. मेट्रोच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने हा मार्ग भुयारी करावा, अशी विनंती करताना मेट्रो 2 बीचे काम पूर्व परवानगीशिवाय सुरू असल्याचा आरोप याचिकेत केला आहे. त्या याचिकेवर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. त्यावेळी एमएमआरडीएच्यावतीने याचिकेत करण्यात आलेले आरोप फेटाळले. मेट्रो प्रशासनाला विविध परवानग्यांची आवश्यकता नसतानाही मेट्रोने त्या सर्व परवानग्या घेतल्या आहेत. वांद्रे येथील कांदळवनांच्या जागेवर बांधकाम करण्यासाठी पर्यावरण विभाग तसेच पश्चिम विभागात मेट्रोचे काम करण्यासाठी महाराष्ट्र कोस्टल झोन विभागाची परवानगी घेण्यात आली आहे. याकडे न्यायालयाचे लक्ष वेधताना न्यायालयाने घातलेली स्थगिती उठविण्यात यावी, अशी विनंती केली. मात्र याचिकाकर्त्यांच्यावतीने अ‍ॅड. गिरीश गोडबोले यांनी मेट्रोला परवानग्यांची गरज नसल्याचा दावा केला असला तरी मेट्रोसाठी अग्निशमन विभागाची परवानगी बंधनकारक आहे. ही परवानगी घेतली नाही, असा दावा केला. उभय पक्षांच्या दाव्यानंतर न्यायालयाने याचिकेची सुनावणी 10 ऑक्टोबरपर्यंत तहकूब ठेवताना एमएमआरडीएला दिलासा देण्यास नकार दिला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

डोंगरीत ४ मजली इमारत कोसळली

मुंबई – मीरा-भाईंदर येथील डोंगरी परिसरात केसरबाई ही चार मजली इमारत कोसळली आहे. या निवासी इमारतीच्या ढिगाऱ्यात जवळपास ५० जण अडकल्याची शक्यता वर्तविण्यात येत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

कोस्टल रोडच्या नव्या कामाला न्यायालयाचा लाल झेंडा

मुंबई – राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मरिन ड्राईव्ह ते बोरीवलीच्या कोस्टल रोडलाच्या नव्या कामाला मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. या...
Read More
post-image
महाराष्ट्र

बुलढाण्यात कारमध्ये गुदमरून दोन मुलांचा मृत्यू

बुलढाणा – कारमध्ये गुदमरून दोन बालकांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बुलढाण्यात घडली आहे. तर एक पाच वर्षांची चिमुकली गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत....
Read More
post-image
महाराष्ट्र

विशेष मागासवर्गाच्या आरक्षणाची अंमलबजावणी १५ दिवसात करणार

मुंबई – विशेष मागास प्रवर्गाला महाराष्ट्र शासनाने १९९४ साली २ टक्के आरक्षण दिले आहे. मात्र आजवर शिक्षण व नोकरीत या आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव प्रकरणाचा उद्या निर्णय

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयात उद्या 17 जुलै रोजी दुपारी 3 वाजता...
Read More