मेट्रो 2 अ , 2 ब आणि 7 वरील 52 उन्नत स्थानके होणार हरित स्थानके – eNavakal
News मुंबई

मेट्रो 2 अ , 2 ब आणि 7 वरील 52 उन्नत स्थानके होणार हरित स्थानके

मुंबई- मुंबई महानगर प्रदेशविकास प्राधिकरणा मा़र्फत दहिसर ते डी एन नगर ते मंडाले मेट्रो 2ब आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो मार्ग 7 वरील एकूण 52 उन्नत स्थानके इंडियन ग्रीन बिल्डिंग काँसिल (आय जी बी सी ) च्या ग्रीन एम आर टी एस मानांकनानुसार विकसित करण्यात येणार आहेत. याचाच अर्थ या तीन मार्गावरील या 52 स्थानकांना ती पूर्ण झाल्यावर हरित प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे. आय.जी.बी.सी संस्था आणि काँफेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री यांनी संयुक्तपणे हा निर्णय घेतला आहे. या हरित स्थानकावर 100 टक्के एल.ई.डी विजेचा वापर होणार आहे.
ऊर्जास्नेही उपकरणांचा वापर करून वातानुकूलनावरील भार कमी करण्याचा प्रयत्न करून विजेचा भार किमानतम राहावा यासाठी अत्याधुनिक उपकरणांचा वापर करण्यात येणार आहे. तसेच नैसर्गिक ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करण्यात येणार असल्याचे एमएमआरडीए कडून सांगण्यात आले. तसेच जिने आणि उदवाहनासाठी व्ही व्ही व्ही एफ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. तसेच सर्व उन्नत स्थानके, कारडेपो इत्यादीसाठी सौरऊर्जेचा वापर करण्यात येणार आहे. वीज , पाणी, आणि सौरऊर्जेचा कार्यक्षम वापर असणारे हरित कार डेपो उभारणार आहे. तसेच कार्बन निर्माण होऊ न देणारी ब्रेक व्यवस्था तसेच कोचेसमध्ये एल.ई डी आणि ऊर्जा स्नेही वीज व्यवस्था आणि किमान वजनाची कोचनिर्मिती
करणार आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

गूगलवर ‘इडियट’ सर्च कराल तर दिसतील ‘ट्रम्प’

वॉशिंग्टन – गूगलने इडियट सर्च केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो येत असल्याने अमेरिकेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत गूगलचे सीईओ सुंदर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

बिग बींच्या प्रतीक्षा बंगल्याची ‘दीवार’ धोक्यात

मुंबई – मुंबईतील जुहू येथील संत ज्ञानेश्वर मार्गाचे 6० फूट रुंदीकरण होणार आहे. त्यामुळे या मार्गावर असणाऱ्या बिग बी अमिताभ यांच्या ‘प्रतीक्षा’ बंगल्याचा काही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

लोकसभा निवडणुकीपूर्वीच जनतेपर्यंत जाऊन पोहचा – मोदी

नवी दिल्ली – कार्यकर्त्यांचे प्रचंड जाळे असूनही भारतीय जनता पक्षाचा राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांत दणदणीत पराभव झाल्यामुळे भाजपा हादरला आहे. आज...
Read More
post-image
महाराष्ट्र

१८ डिसेंबर रोजी नांदेड मनपा सभापती पदाची निवडणूक

नांदेड – महापालिका स्थायी समिती सभापतीची निवडणूक १८ डिसेंबर रोजी होणार असून या निवडणुकीसाठी पिठासिन अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांनी हा...
Read More
post-image
मुंबई

मुंबई मेट्रो ३ च्या दिनदर्शिकेत विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्रे झळकणार

मुंबई – मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या २०१९ दिनदर्शिकेमध्ये काही आकर्षक चित्रे सर्वसामान्य लोकांना पाहायला मिळणार आहेत. आगामी वर्षाची दिनदर्शिका सर्वोत्तम असावी यासाठी एमएमआरसीने “मुंबई...
Read More