मेट्रोचे रात्रीचे काम रखडणार? मेट्रोचे काम रहिवाशांचा रक्तदाब, चिंता वाढवणारा – eNavakal
News मुंबई

मेट्रोचे रात्रीचे काम रखडणार? मेट्रोचे काम रहिवाशांचा रक्तदाब, चिंता वाढवणारा

मुंबई- मेट्रोच्या कामामुळे होणार्‍या आवाजाची पातळी ही मर्यादेपेक्षा जास्तच आहे.. या आवाजाजामुळे जवळपासच्या रहिवाश्यांची आधीच डोकेदुखी वाढली असताना आता शारीरिक आजारपणातही भर पडत आहे. या कामामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून हा आवाज रक्तदाब, मनावरील ताण आणि चिंता वाढवणारा असल्याचा अहवालच निरीने आज न्यायालयात सादर केला. या मुळे रात्रीच्या वेळी मेट्रोचे रात्रीच ेकाम रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

डिसेंबर 2017 मध्ये ध्वनी प्रदूषणाच्या मुद्यावर दक्षिण मुंबईत रात्रीच्या वेळी मेट्रोचे काम करण्यास उच्च न्यायालयाने घातलेली बंदी उठवावी अशी विनंती करणारा अर्ज मेट्रो प्रशासनाने उच्च न्यायालयात केला आहे. तर त्या मुंबईतील स्थानिक नागरिक रॉबीन जयसिंघानी यांनी आक्षेप घेतला आहे.
त्या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी निरी (नॅशनल इन्वायरोमेंटल इंजिनिअरींग रिसर्च इन्स्टिट्युट) या संस्थेने गेली आठ दिवस दक्षिण मुंबईत सुरु असलेल्या मेट्रोच्या कामाचे सर्वेक्षण करून अहवाल सादर केला.न्यायालयाने हा अहवाल स्विकारून याचिकेची सुनावणी सुनावणी 13 ऑगस्टपर्यंत तहकूब ठेवली.

निरीचा अहवाल
मुंबइतील आवाजाची पातळी मर्यादेपेक्षा जास्त आहे. त्यात मेट्रोच्या कामामुळे ती वाढणार आहे . या आवाजामुळे जवळपासच्या रहिवाश्यांची आधीच डोकेदुखी वाढली असताना आता शारीरिक आजारपणातही भर पडत आहे.नागरीकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून हा आवाज रक्तदाब, मनावरील ताण आणि चिंता वाढवणारा असल्याचे निरीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

उमेदवारांसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्‍याच्या मुदतीत वाढ

नांदेड – राखीव जागेवर निवडून आलेल्‍या उमेदवारांनी त्‍यांचे जात वैधता प्रमाणपत्र सहा महिन्याऐवजी बारा महिण्‍यात सादर करण्‍याबाबत अद्यादेश जारी करण्‍यात आला आहे. सदर सुधारणा अद्यादेशामुळे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

भाजपच शिवसेना नेतृत्वाला अल्टीमेटम?

मुंबई – केंद्रात आणि राज्यात युतीत असलेल्या शिवसेनेने अनेकवेळा भाजपवर टीका करत एकला चलो रे, ची साद दिली आहे.  मात्र, आज भाजप पक्षश्रेष्ठीनीच शिवसेनेची कोंडी...
Read More
post-image
महाराष्ट्र

राज्य शासन नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी – महादेव जानकर

नांदेड – उत्पन्न वाढीसाठी शेतीसह जोड व्यवसाय केल्यास शेतकऱ्यांसह तरुणांना रोजगार मिळण्यास मदत होईल. यासाठी राज्य शासन नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी असेल, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन,...
Read More
post-image
महाराष्ट्र

दुष्काळाबाबत लवकरच जीआर काढणार – मुख्यमंत्री

मुंबई – ३१ ऑक्टोबरनंतर राज्यातील तब्बल 179 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करणार, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी जाहीर केले. त्यानंतर सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
क्रीडा

ही आहे धोनीची नवी स्टाईल

नवी दिल्ली – भारत विरुध्द वेस्टइंडीज यांच्यातील पहिला सामना रविवारी खेळण्यात आला, त्यादरम्यान टीम इंडियाचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी याने स्वत:चे काही फोटो सोशल...
Read More