मुस्लीम आरक्षणावरून अधिवेशनात गदारोळ, ‘भाजपा सरकार मनुवादी’! काँग्रेसचा हल्लाबोल – eNavakal
महाराष्ट्र राजकीय

मुस्लीम आरक्षणावरून अधिवेशनात गदारोळ, ‘भाजपा सरकार मनुवादी’! काँग्रेसचा हल्लाबोल

नागपूर -मुस्लीम आरक्षणाच्या प्रश्नावरून आज हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विरोधकांनी गोंधळ घालून सभात्याग केला. विधानसभा सुरळीत चालू असताना विधानपरिषदेत मात्र संख्याबळाच्या आधारावर काँगे्रस-राष्ट्रवादीसह इतर पक्ष सदस्यांनी एकत्र येऊन भाजप सदस्यांना व मंत्र्यांना भंडावून सोडले. अल्पसंख्याकांच्या मुद्यावरून विरोधकांनी घातलेल्या गोंधळासमोर सत्ताधारी हतबल झाले.

आज विधानपरिषद कामकाजाची सुरुवातच मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याच्या प्रश्नाने झाली. काँगेस आमदार संजय दत्त यांनी मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याविषयी सरकार काहीच का हालचाल करत नाही, असा प्रश्न उपस्थित केला. आमच्या काँगे्रस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने तीन वर्षांपूर्वी मुस्लीम आरक्षणाचा निर्णय घेतला होता. परंतु त्यानंतर अल्पसंख्याक विरोधी सरकार सत्तेवर आल्याने बारा अधिवेशने झाली. तरी मुस्लीम आरक्षणापूर्वी सरकार ढिम्म असल्याचे दत्त म्हणाले. यावर उत्तर देताना राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी काँगे्रसने आजपर्यंत मुस्लीम अनुनयाचेच राजकारण केले आणि आताही त्यासाठी मुस्लीम आरक्षणाचा निर्णय काँगे्रसने निवडणुकीच्या तोंडावर घेतला होता, असे उत्तर दिले. यावर काँगे्रसचे गटनेते शरद रणपिसे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आक्षेप घेत मंत्री कांबळे न्यायालयाचा अवमान करत आहेत, असे सभापतींना सांगितले. त्यानंतर विरोधी आमदारांनी गदारोळ घातला.
‘अल्पसंख्याक विरोधी सरकारचा निषेध असो’, ‘मनमानी कारभार खपवून घेणार नाही’, अशा घोषणा विरोधकांनी द्यायला सुरुवात केली. काँग्रेस गटनेते रणपिसेंसोबत संजय दत्त, भाई जगताप, अमर राजूरकर, श्रीकांत देशपांडे, हुस्नबानो खलिपे, आनंदराव पाटील, हरिभाऊ राठोड, जनार्दन चांदुरकर, राष्ट्रवादी काँगे्रसचे सुनील तटकरे, विद्या चव्हाण, हेमंत टकले, जयंत जाधव, जयराज गायकवाड, विक्रम काळे, शेकापचे जयंत पाटील, जनता दलचे कपिल पाटील या सर्व विरोधी आमदारांनी घोषणा दिल्याने एकच गोंधळ उडाला. त्यानंतर सर्व सदस्यांनी एकजुटीने सभात्याग केला.
सर्व आमदार पुन्हा सभागृहात आल्यावर मंत्री विनोद तावडे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या मदतीला धावून आले. एकूणच आरक्षणावर तावडे यांनी घटनेतील संदर्भ देऊन विरोधकांवरच पलटवार केला. धर्माच्या आधारावर आरक्षण देणे म्हणजे बहुसंख्याक आणि अल्पसंख्याकांमध्ये दुफळी पाडणे आहे. आमचे सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या विचारावर चालणारे सरकार आहे, असे तावडे म्हणाले. यावर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला. मनुवादी सरकार अल्पसंख्याकांवरती अन्याय करत आहे, असे भाई जगताप म्हणाले. यावर सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी ‘आम्ही तुम्हाला टेलिव्हिजनवर ऐकतो, सभागृहात तरी आमचं तुम्ही ऐका, इतर सदस्यांना बोलू द्या’ असे सांगितले.  सलग चौथ्या दिवशी विधानपरिषदेत सर्व विरोधी सदस्यांची एकजूट पहायला मिळाली. सध्या विधानपरिषदेत सर्वाधिक सदस्य राष्ट्रवादीचे आहेत. त्यामुळे विधानपरिषदेत विरोधकांची सत्ताधार्‍यांवर सरशी झालेली पहायला मिळत आहे.

पटोले, देशमुखांच्या
मार्गावर आता गाणार

थेट पक्षविरोधी भूमिका घेतलेले नाना पटोले, त्यानंतर सभागृहात भाजपाचा निषेध करणारे आमदार आशिष देशमुख आणि आता शिक्षणाच्या प्रश्नाच्या निमित्ताने विरोधकांना जाऊन मिळालेले भाजपा आमदार ना.गो. गाणार हे चर्चेत आले आहेत. आज अनुदानित शाळांचा रेंगाळलेला प्रश्न राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे यांनी उपस्थित केला. त्यानंतर जनता दलाचे आमदार कपिल पाटील यांनी शाळा आणि शिक्षकांच्या बाबतीत सरकार गंभीर नसल्याचा आरोप केला. या प्रश्नावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलेल्या उत्तरावर विरोधकांचे समाधान झाले नाही आणि विरोधी सदस्यांनी पुन्हा गदारोळाला सुरुवात केली. यावेळी विदर्भातील भाजपा आमदार ना.गो. गाणारही विरोधकांच्या सुरात सूर मिळवताना दिसले. त्यामुळे सत्ताधारी सदस्यही आवाक् झाले. एवढेच नव्हे तर सभागृह तहकूब झाल्यानंतर सर्व विरोधी सदस्यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाबाहेर माध्यमांशी संवाद साधला. यावेळीही सर्व विरोधी आमदारांसोबत भाजपा आमदार ना.गो. गाणार उपस्थित होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

विराटची टीम इंडिया आज वेस्ट इंडीजला भिडणार

चेन्नई – टी-२० मालिकेपाठोपाठ आजपासून भारत-वेस्ट इंडीज यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला प्रारंभ होत आहे. विराट कोहलीचा भारतीय संघ दक्षिण आफ्रिका, बांगलादेश यांच्यापाठोपाठ आता...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

आज दुपारी १२ वाजता विरोधी पक्षांची बैठक; १ वाजता पत्रकार परिषद

नागपूर – उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरण्याची रणनीती आखण्याबाबत आज विरोधी पक्षांची बैठक पार पडणार आहे. आज दुपारी १२ वाजता रविभवनातील विरोधी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

अरेरे! उद्यापासून दूध महागणार

पुणे – इंधन आणि कांद्याच्या दरवाढीनंतर आता दूधाच्या किंमतीही वाढणार आहेत. राज्यात गायीचे दूध सोमवारपासून लिटरमागे दोन रुपयांनी महागणार आहे. त्यामुळे गायीच्या दुधाच्या एका लिटरसाठी...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश

आजपासून चारचाकी वाहनांना महामार्गावर ‘फास्ट टॅग’ सुरू

नवी दिल्‍ली- चारचाकी वाहनाधारकांचा प्रवास वेगवान होण्यासाठी आज रविवारपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून ‘फास्ट टॅग’ सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या वाहनांना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; नव्या सरकारची परीक्षा

नागपूर – राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होणार असून यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा कस लागणार आहे. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...
Read More