मुसळधार पावसातही रत्नागिरी शहरात पाणीटंचाई – eNavakal
News आजच्या ठळक बातम्या जीवनावश्यक महाराष्ट्र

मुसळधार पावसातही रत्नागिरी शहरात पाणीटंचाई

रत्नागिरी – रत्नागिरी शहरात मुसळधार पाऊस सुरु असतानाही रत्नागिरी शहरातील बहुतांश भागात पाणीटंचाई असल्याचा आरोप सत्ताधारी नगरसेवकांनी केला आहे. यामुळे रत्नागिरी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गदारोळ माजला. तीन-चार दिवस टँकर पाठविला जात नाही. पालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा सुरु आहे. घराबाहेर पाणी आहे, परंतु घरात पाणी नाही अशी अवस्था शहरवासियांची झाल्याचा गंभीर आरोप सत्ताधारी नगरसेवकांनी सभागृहात केला. त्यामुळे सत्ताधा-यांच्या सूरात विरोधकांनीही सूर मिसळून पाणी विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यामुळे सभागृहाचे वातावरण तणावग्रस्त झाले होते.

विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर प्रथमच रत्नागिरी पालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली. विषय पत्रिकेवरील विषयांना सुरुवात होण्यापूर्वीच नगरसेविका वैभवी खेडेकर यांनी शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न उपस्थित केला. जिल्हा परिषद जवळील पाणी साठवण टाकीतून ज्या भागाला पाणीपुरवठा केला जातो तेथे पाणी नागरिकांना मिळत नाही. सकाळी 5 वाजल्यापासून स्थानिक नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. पाणी विभागाचे अधिकारी केलेल्या सूचनांचे पालन करीत नाहीत. धरणात मुबलक पाणी असूनही शहरवासियांना पाणी-पाणी करण्याची वेळ आल्याचा आरोप नगरसेविका खेडेकर यांनी केला. याला भाजपा, राष्ट्रवादीच्या नगरसेविकांनी पाठिंबा देत पाणी प्रश्न तात्काळ सोडवा अशी आग्रही मागणी नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्याकडे केली. पाणी प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विशेष सभा बोलवा यासाठी नगरसेवक आक्रमक झाले होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

विक्रम लँडरशी संपर्काची आशा धूसर; चंद्रावर संध्याकाळ

नवी दिल्ली – भारताची महत्त्वाकांशी मोहीम असलेल्या चांद्रयान २ च्या विक्रम लँडरशी संपर्क करण्याची मुदत कमीकमी होत चालली आहे. 6 आणि 7 सप्टेंबरच्या दरम्यान...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘आयफा’ने गाजवली रात्र; ‘ही’ अभिनेत्री ठरली सर्वोत्कृष्ट

मुंबई – बॉलिवूड चित्रपटाचा सोहळा ‘आयफा’ सोमवारी मुंबईत पार पडला. यंदाचं आयफा पुररस्कारांचं हे २०वं वर्ष. दरवर्षी परदेशातच पार पडणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याची रंगत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राजनाथ सिंह आज ‘तेजस’मधून उड्डाण करणार

नवी दिल्ली – देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज ‘तेजस’ या भारतीय बनावटीच्या लढाऊ विमानातून प्रवास करणार आहेत. तेजसच्या दोन सीट असलेल्या एअरक्राफ्टमधून राजनाथ...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

गरज असेल तरच घराबाहेर पडा! आज अतिवृष्टीचा इशारा

मुंबई – मुंबई उपनगरासह राज्यातील अनेक भागांना काल रात्रभर पावसाने झोडपल्यानंतर आज मुंबई, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्याला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र हवामान

मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

मुंबई – भारतीय हवामान विभागाने आज मुंबईसह उपनगर, ठाणे आणि कोकणात आज अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शालेय शिक्षण मंत्री...
Read More