मुले ‘वेट लिफ्टर’ नाहीत; दुसरीपर्यंत होमवर्क नको – हायकोर्ट – eNavakal
देश न्यायालय

मुले ‘वेट लिफ्टर’ नाहीत; दुसरीपर्यंत होमवर्क नको – हायकोर्ट

चेन्नई – मुले ‘वेट लिफ्टर’ नाहीत. त्यांची दफ्तरे मालवाहतूक करणारे कंटेनर नाहीत. मुलांवर शिक्षणाचं ओझं लादू नका, इयत्ता दुसरीपर्यंत मुलांना होमवर्क देऊ नका, असे आदेश मद्रास हायकोर्टाने केंद्राला दिले. सीबीएसई शाळांमध्ये एनसीईआरटी अभ्यासक्रम सुरू करण्याचे आदेशही हायकोर्टाने दिले.

मद्रास हायकोर्टात एम. पुरुषोत्तम यांनी सीबीएसई शाळांमध्ये एनसीईआरटीने प्रकाशित केलेल्या पुस्तकांची सक्ती करावी, अशी मागणी करणारी याचिका दाखल केले होती. या याचिकेवर न्या. एन. किरुबाकरन यांनी निर्णय दिला. हायकोर्टाने एनसीईआरटीच्या पुस्तकांची सक्ती केली आहे. पण त्यासोबत अन्य काही महत्त्वाच्या विषयांवर हायकोर्टाने निर्णय दिला.

मुलांना बालपणाचा आनंद पूर्णपणे लुटू द्या. तो त्यांचा अधिकारच आहे. त्यांना कोणताही ताण देऊ नका. घटनेच्या २१ व्या कलमात हा अधिकार त्यांना देण्यात आला आहे. मुलांची झोप झाली नाही तर त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मुले पाच वर्षांची होत नाहीत तोपर्यंत त्यांच्या हातात पेन्सिल देऊ नये, असे हायकोर्टाने याचिकेवरील सुनावणीदरम्यान म्हटले आहे. मुले ‘वेट लिफ्टर’ नाहीत. दप्तराचे ओझे हे विद्यार्थ्याच्या वजनाच्या १० टक्के इतकेच असावे. त्यापेक्षा जास्त वजन नसावे, असे हायकोर्टाने निकालात म्हटले आहे. मुलांना शिक्षणासाठी अनुकूल वातावरण तयार करावे. पहिली आणि दुसरी इयत्तेतील मुलांना होमवर्क दिल्याने त्यांच्या झोपेवर परिणाम होतो. मुलांच्या पाठीवर दफ्तराचे ओझे नको, असेही हायकोर्टाने सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
ट्रेंडिंग

क्वारंटाईनमध्ये काय खावं आणि काय टाळावं? ‘WHO’ ने दिल्या ‘या’ सूचना! 

लॉकडाउनच्या काळात प्रत्येकजण घरी राहून आपापल्या आरोग्याची काळजी घेत आहेत. सध्या कोरोना या महामारीपासून बचाव करण्यासाठी लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. पोषक आहार, व्यायाम आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

इस्राईलचे आरोग्य मंत्री व त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण

जेरुसलेम – कोरोनाची लागण झालेल्या बड्या लोकांच्या यादीत आता इस्राईलचे आरोग्य मंत्री यांचं देखील नाव सामील झालं आहे. इस्राईलचे आरोग्यमंत्री याकोव्ह लिट्झमॅन आणि त्यांच्या...
Read More
post-image
ट्रेंडिंग

घरात चिडचिड होऊ नये, यासाठी काय करावं?

जगावर कोरोनाचे संकट असल्याने आणि देशात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे आपल्याला मनसोक्त घराबाहेर पडत येत नाही. अर्थात हे आपल्या काळजीसाठीच असलं तरी घरात राहून कंटाळा...
Read More
post-image
ट्रेंडिंग

आश्चर्यम! लॉकडाउन असूनही ४२.२ किमीची मॅरेथॉन केली पूर्ण

लॉकडाउन संपून कधी एकदाचं घराबाहेर हिंडायला जातो, असं सध्या प्रत्येकाच्याच मनात येत असणार. पण काय आहे कि, लॉकडाउन असल्याने त्याचे नियम तर पाळावेच लागणार....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबईकरांनो काळजी घ्या! एका दिवसांत वाढले ५७ रुग्ण

मुंबई -राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढते आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ८१ रुग्ण नव्याने दाखल झाले आहेत. त्यापैकी ५७ रुग्ण एकट्या मुंबईत सापडले आहेत....
Read More