मुलानेच दिले आई-वडिलांना नारळपाण्यातून विष – eNavakal
गुन्हे महाराष्ट्र

मुलानेच दिले आई-वडिलांना नारळपाण्यातून विष

लातूर – लातूरमध्ये पोटच्या मुलानेच आई-वडिलांना विष दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नारळपाण्यामधून विष देऊन आई-वडिलांना ठार करण्याचा प्रयत्न मुलाकडून करण्यात आला. नारळपाणी पिऊन ६५ वर्षीय वडिलांचा मृत्यू झाला असून आईची प्रकृती गंभीर आहे. प्रॉपर्टीच्या वादातून हे कृत्य घडल्याची माहिती मिळत आहे.

ज्ञानदीप कोटंबे असे आरोपी मुलाचे नाव असून त्याचे एक महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. मुलाचा संसार पाहण्यासाठी ज्ञानदीपचे आई-वडील औरंगाबादहून लातूर येथे आले होते. यावेळी ज्ञानदीपने नारळपाण्यामधून आई-वडिलांना विष दिले. नारळपाणी पिऊन झाल्यावर दोघांना अस्वस्थ वाटू लागल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू झाला असून आईची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

लातूर शहरातील घर वडिल नावावर करून देत नसल्याने हे कृत्य घडल्याचे सांगण्यात येत आहे साधुराम कोटंबे असे मृत्यू झालेल्या वडिलांचे नाव आहे. आई गायाबाई कोटंबे यांनी पोलिसांकडे नोंदविलेल्या जबाबावरून ज्ञानदीप कोटंबे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

#IPLAuction2019 आयपीएलच्या लिलावास सुरुवात

जयपूर – पुढील वर्षी सुरु होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या(आयपीएल) लिलावास सुरुवात झाली आहे. जयपूर येथील हा लिलाव पार पडत आहे. पुढील वर्षी मार्च महिन्याच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

(अपडेट) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणास मराठीतून सुरुवात

कल्याण – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते कल्याणमध्ये दाखल झाले असून त्यांच्या हस्ते ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो ५ मार्गाचे भूमिपूजन झाले आहे. ३३...
Read More
post-image
महाराष्ट्र

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय कर्मचार्‍यांचे 27 डिसेंबरला उपोषण

मुंबई – मुंबईतील वाचन संस्कृती वाढावी म्हणून मेहनत करणार्‍या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कर्मचार्‍यांना गेल्या अनेक वर्षांत वेतनवाढ व बढती मिळालेली नाही. तीन वेळा आंदोलन करूनही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राज ठाकरेंना इगतपुरी कोर्टात जामीन मंजूर

इगतपुरी – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना इगतपुरी कोर्टात जामीन मंजूर करण्यात आले आहे. २००८ साली परप्रांतीयांविरोधात केलेल्या आंदोलनाप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

शेतकरी कर्जमाफी होईपर्यंत मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी

नवी दिल्ली – गेल्या साडेचार वर्षात पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांची १ रुपयाही कर्जमाफी केली नाही, असे म्हणत ‘मोदी सरकार जोपर्यंत देशातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करत नाही नरेंद्र...
Read More