मुलाच्या शिक्षणाच्या झालेल्या भांडणातून पत्नीची हत्या! पती फरार – eNavakal
News मुंबई

मुलाच्या शिक्षणाच्या झालेल्या भांडणातून पत्नीची हत्या! पती फरार

मुंबई – मुलाच्या शिक्षणावरुन झालेल्या भांडणातून एका 30 वर्षांच्या महिलेची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केल्याची घटना गोरेगाव परिसरात घडली. हत्येनंतर पतीने पत्नीने आत्महत्या केल्याचा बनाव करुन पलायन केले. पूजा निरज गौड असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून तिचा पती निरज गौड याचा गोरेगाव पोलीस शोध घेत आहेत. ही घटना रविवारी सायंकाळी चार ते रात्री अकराच्या दरम्यान गोरेगाव येथील तीन डोंगरी, समर्थ डेरी फार्मजवळील सिद्धा रामेश्वर नगरात घडली. याच परिसरात निरज हा त्याची पत्नी पूजा, दहा वर्षांची मुलगी आणि सहा वर्षांच्या मुलासोबत राहतो. गौड कुटुंबिय मूळचे उत्तर प्रदेशच्या अलाहाबादचे रहिवाशी आहेत. निरज आणि पूजा यांचा अकरा वर्षांपूर्वी विवाह झाला होता.
विवाहानंतर ते गोरेगाव येथे राहण्यासाठी आले होते. तो रिक्षाचालक म्हणून काम करीत होता. गेल्या काही महिन्यांपासून या दोघांमध्ये नेहमीच घरगुती कारणावरुन खटके उडत होते. रविवारी सायंकाळी चार वाजता पूजाने मुलाच्या शिक्षणासाठी त्याच्याकडे फीची मागणी केली होती. त्यावरुन त्यांच्यात पुन्हा कडाक्याचे भांडण झाले होते. या भांडणानंतर रागाच्या भरात त्याने पूजाची गळा आवळून हत्या केली होती. हत्येनंतर त्याने तिचा मृतदेह छताच्या पत्र्याच्या पाईपला लटकवून ठेवला होता. जेणेकरुन तिने आत्महत्या केल्याचे अनेकांना वाटेल. या घटनेनंतर तो तेथून पळून गेला होता. दुसर्‍या दिवशी हा प्रकार निरजच्या कुटुंबियांच्या निदर्शनास येताच त्यांनी गोरेगाव पोलिसांना ही माहिती दिली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

दिल्ली, जम्मूनंतर आता महाराष्ट्रातही भूकंपाचे धक्के, ‘या’ जिल्ह्यात जाणवले हादरे

सातारा – देशभर विविध राज्यात भूकंपाचे धक्के जाणवत असताना आता महाराष्ट्रातही भूकंपाचे हादरे बसायला लागले आहेत. साताऱ्यातील कोयना परिसरात २.६ रिश्टर तीव्रतेचे भकंपाचे धक्के...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील अपघातात मुलासह आई-वडिलांचा मृत्यू

वाशिम – नागपूर-औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात झाला असून या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.  हा अपघात इतका भीषण होता की, यात कारचा चक्काचूर झाला....
Read More
post-image
विदेश

एअर फ्रान्स ७,५०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका इतर विमान कंपन्यांप्रमाणेच एअर फ्रान्सनालाही बसला आहे. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या एअर...
Read More
महाराष्ट्र

एसबीआयच्या ५ कर्मचाऱ्यांना कोरोना, परळीसह १६ गावांमध्ये लॉकडाऊन

बीड – परळीतील स्टेट बँक ऑफ इंडियातील ५ कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे काल उघडकीस आल्यानंतर आजपासून परळी शहर आणि परिसरातील १६ गावांमध्ये ८ दिवसांचा...
Read More
post-image
महाराष्ट्र

धुळे पालिका क्षेत्रातील सर्व दुकाने सोमवारपासून ४ वाजताच बंद होणार

धुळे – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. त्याबरोबरच मिशन बिगिन अगेन राबवीत जनजीवन पूर्व पदावर आणण्याचा प्रयत्न करीत...
Read More